18 January 2021

News Flash

Viral Video: गच्चीवर माकड उडवत होते पतंग; नेटकरी म्हणतात, “उत्क्रांतीचा वेग वाढला”

३१ हजारहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे

गच्चीवर माकडाची पतंगबाजी

लॉकडाउन सुरु झाल्यापासून इंटरनेटवर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाखो लोकं घरीच असताना अनेक ठिकाणी जंगली प्राणी रस्त्यावर आल्याचे चित्र दिसत आहे. असाच एका व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक माकड गच्चीवर बसून चक्क पतंग उडवताना दिसत आहे.

दोन दिवसांपासून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये माकड पतंगाचा मांजा पकडून ढील देताना दिसत आहे. माकडाला पतंग उडवताना पाहून अनेकजण आरडाओरड करुन त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहे. अनेक लोकं आरडाओरड करतानाचा आणि हसतानाचा आवाज या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. व्हिडिओच्या शेवटी हे माकड पतंग खाली खेचून हातात पकडताना दिसत आहे.

“लॉकडाउनमुळे खूप झपाट्याने उत्क्रांती होताना दिसत आहे,” अशी कॅप्शन देत इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसचे अधिकारी असणाऱ्या सुशांत नंदा यांनी ट्विटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. “माकड पतंग उडवताना दिसत आहेत. हो हे माकडच आहे,” असंही त्यांनी व्हिडिओ पोस्ट करताना म्हटलं आहे.

अनेकांनी या व्हिडिओवर प्रितिक्रिया नोंदवताना माकडाचे कौतुक केलं आहे तर काहींनी यावर मजेदार कमेंट केल्या आहेत.

अनेकांना प्रयत्न करुनही हे जमत नाही…

मस्त व्हिडिओ

माकड पंतंग उडवू शकतो असं कधी वाटलं नव्हतं

माझ्यापेक्षा चांगली पतंग उडवली माकडाने

काही दिवसांनी माकडं हे ही करतील


काही दिवसामध्ये जुमांजी चित्रपटासारखी परिस्थिती होईल जगभरात

हा व्हिडिओ ३१ हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर तीन हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 9:47 am

Web Title: coronavirus monkey flying a kite in this viral video scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 कामावर येऊ नको सांगितले असतानाही कामावर गेलेल्या कर्मचाऱ्याच्या तोंडावर बॉसनेच मारला बुक्का
2 ‘रतन टाटांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या’; ऑनलाइन याचिकेला लाखो नेटकऱ्यांचा पाठिंबा
3 Coronavirus : ७२ वर्षीय आजोबांनी पेन्शनच्या पैशातून तयार केले मास्क; पंतप्रधानांनीही केलं कौतुक
Just Now!
X