28 February 2021

News Flash

CoronaVirus : ‘चॅम्पियन’ खेळाडूची करोनाला ‘टशन’; बनवलं दमदार गाणं

ब्राव्होच्या गाण्यातील शब्दांत सकारात्मकता दिसून येते...

करोनाच्या फैलावामुळे सध्या जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सुरू असलेल्या काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत.

भारताची देशांतर्गत आघाडीची टी २० स्पर्धा IPL देखील अद्याप सुरू झालेली नाही. देशभरात लॉकडाउन असल्याने IPL जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे परदेशी खेळाडू देखील आपापल्या घरी विसावले आहेत. अनेक क्रीडापटू आणि क्रिकेटपटू करोनाग्रस्तांना विविध प्रकारे मदत करत आहेत.

या संकटकाळात वेस्ट इंडीजच्या अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने जगातील सर्व लोकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आपले नवीन गाणे ‘नॉट गिव्हिंग अप’ लॉन्च केले आहे. जगभरातील सर्व प्रकारचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्याच्या नवीन गाण्यात ब्राव्होने सध्याची परिस्थिती किती वाईट आहे ते सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

On this Outbreak due to Pandemic, My Heartful Prayers to all of you out there! Lets fight together

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 3:28 pm

Web Title: coronavirus outbreak lockdown dwayne bravo we not giving up latest song on covid 19 will melt your heart watch video vjb 91
टॅग : Coronavirus,Cricket,Ipl
Next Stories
1 रिचार्ज न करता सात दिवस पाहा TV, ‘लॉकडाउन’दरम्यान खास ऑफर
2 अडकलेल्या मजुरांसाठी मुंबई-दिल्लीहून SpiceJetचं स्पेशल विमान? मदतीसाठी घेतला पुढाकार
3 कडक सॅल्यूट! दिव्यांग तरुणीसाठी मुंबई पोलिसांनी जे केलं ते वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल
Just Now!
X