09 March 2021

News Flash

CoronaVirus : “विराट, सचिन.. लाज वाटते की नाही..?”; नेटिझन्सचा सोशल मीडियावर संताप

असं घडलं तरी काय? जाणून घ्या कारण

करोना तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून सर्वत्र याबाबत जनजागृती केली जात आहे. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘हम तुम एक कमरे में बंद हो’… पाहा हार्दिक-नताशाचा ‘लॉकडाउन’ स्पेशल फोटो

पाकिस्तानातील बहुतांश लोकांचा रोजगार हा रोजंदारीवर असल्यामुळे लॉकडाउन करणं शक्य नसल्याचं पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. मात्र करोनाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला सध्या अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आहे. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आपली जबाबदारी ओळखत गरजू व्यक्तींना मोफत अन्नधान्याचे वाटप करत आहे. तो त्यासंदर्भातील फोटो आणि अपडेटदेखील ट्विटरवरून साऱ्यांना देत आहे.

विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्यांसाठी सचिनचा खास संदेश, म्हणाला…

आफ्रिदीकडून केली जात असलेली मदत पाहून भारतातील क्रिकेटप्रेमी आणि नेटिझन्स यांनी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

CoronaVirus : व्वा दादा..!! गरीब-गरजुंसाठी गांगुलीकडून ५० लाखांची मदत

आफ्रिदीने आपल्या फेसबूक अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत, करोनामुळे पाकिस्तानमधल्या सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली होती. अनेकांना अन्नधान्य, सॅनेटायजर, टिश्यू या सारख्या गोष्टी मिळत नसल्याचं आफ्रिदीने सांगितलं होतं. याच कारणासाठी आपण आपल्या लगतच्या खेड्यांमध्ये मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचं आफ्रिदीने सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:59 pm

Web Title: coronavirus outbreak lockdown fans abuse virat kohli sachin tendulkar as shahid afridi helps poor needy people in pakistan vjb 91
Next Stories
1 ‘फ्लिपकार्ट’च्या ऑनलाइन सेवा पुन्हा सुरू, आवश्यक वस्तूंची करणार डिलिव्हरी
2 ‘लॉकडाउन’मध्ये ‘पेटीएम’द्वारे मिळवा गॅस सिलिंडर, जाणून घ्या कसं ?
3 आला नवीन ‘स्वस्त’ स्मार्टफोन, कमी किंमतीत ‘ढासू’ फीचर्स
Just Now!
X