CoronaVirus Outbreak : करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. तरीदेखील लोक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने अखेर पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली.
IPL : मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज… ‘या’ ५ खेळाडूंनी दोनही संघाकडून मिळवलं विजेतेपद
करोनाचं संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवड्याभरातच दुसऱ्यांदा देशाला संबोधित करत मोठी घोषणा केली. करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं अत्याधुनिक साधनं असूनही हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की तयारीच करता येत नाही. त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. त्यानंतर बडे क्रिकेटपटू घरातच व्यायाम करताना दिसले. हार्दिक पांड्याचाही सध्या असाच एक फोटो व्हायरल झाला आहे.
ज्वाला गुट्टाला आली बॉयफ्रेंडची आठवण; त्याने दिला झकास रिप्लाय
हार्दिक पांड्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत हार्दिक पांड्याने घरच्या जिममध्ये व्यायाम केल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत त्याची प्रेयसी नताशा स्टॅन्कोविच, भाऊ कृणाल पांड्या आणि कृणालची पत्नी पंखुरी हे लोक आहेत. त्या चौघांनी एकत्र जिममध्ये वर्कआऊट केल्यानंतरचा फोटो पोस्ट केला आहे.
२-३ दिवसांपूर्वी नताशा स्टॅन्कोविचनेही एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोत दोघेही आपल्या कुत्र्यासोबत बेडवर निवांत पडलेले दिसत होते. हा खास फोटो शेअर करताना नताशाने करोनाच्या फटक्यापासून सर्वांनी सुरक्षित राहा असे आवाहनही केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 30, 2020 11:41 am