News Flash

भारतातील करोना परिस्थिती पाहून पाकिस्तानीही हळहळले; #PakistanstandswithIndia पाकमध्ये Top Trend

स्वत:ला एकटं समजू नका, असं पाकिस्तानमधील नेटकऱ्यांनी भारतीयांना सांगितलंय

फोटो ट्विटरवरुन साभार

भारतामधील करोना परिस्थिती दिवसोंदिवस गंभीर होत चालल्याचे चित्र दिसत आहे. करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून सलग दुसऱ्या दिवशी २४ तासांत आणखी ३.३२ लाख जणांना करोनाची लागण झाली. हा एका दिवसातील उच्चांक असून त्यामुळे बाधितांची एकूण संख्या एक कोटी ६२ लाख ६३ हजार ६९५ वर पोहोचली आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने २४ लाखांचा टप्पा ओलांडला असून एका दिवसात आणखी २२६३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, असे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. भारतातील करोनाची परिस्थिती पाहून भारताचा शेजरी असणाऱ्या पाकिस्तानमधून आता भारतासाठी आणि भारतीयांसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. शुक्रवारी रात्रापासून सोशल नेटवर्किंगवर खास करुन पाकिस्तानमधील सोशल नेटवर्किंग ट्रेण्डमध्ये #PakistanstandswithIndia म्हणेच पाकिस्तान भारतासोबत उभा आहे असं सांगणारा ट्रेण्ड टॉप ट्रेण्ड ठरला आहे.

पाकिस्तानमधील अनेक नागरिकांनी भारतांना धीर धरण्याचा, खचून न जाण्याचा सल्ला देताना #PakistanstandswithIndia हा हॅशटॅग वापरला आहे. अनेकांनी शेजरी म्हणून आम्ही या संकटाच्या कालावधीमध्ये भारतासोबत आहोत असं म्हटलं आहे पाहुयात काही व्हायरल ट्विट

१) पाकिस्तानात टॉप ट्रेण्ड

२) मानवता जिंकली पाहिजे

३) प्रेम हे द्वेषापेक्षा चांगलं असतं

४) आपण सारी माणसंच आहोत

५) जीवन मरणाचा प्रश्न असेल तेव्हा एकत्र रहायला हवं

६) एक नाही चार ट्रेण्ड

७) भारताला देऊ केली मदत

८) स्वत:ला एकटं समजू नका…

९) हे खूप छान आहे

१०) धन्यवाद पाकिस्तान

११) भारतासाठी म्हणजे मानवतेसाठी प्रार्थना करुयात

१२) मी भारतासोबत आहे

१३) एकत्र येऊन द्वेष संपवूयात

१४) आधी मानवता

१५) हत्यारांवर खर्च केले पण…

दरम्यान, भारतामधील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत असून सध्या देशात २४ लाख २८ हजार ६१६ उपचाराधीन रुग्ण आहेत. हे प्रमाण एकूण बाधितांच्या १४.९३ टक्के इतके आहे. तर करोनातून बरे होण्याचे प्रमाण ८३.९२ टक्के झाले आहे. आतापर्यंत एक कोटी ३६ लाख ४८ हजार १५९ जण करोनातून बरे झाले असून मृत्युदर आणखी घसरून १.१५ टक्के इतका झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 8:14 am

Web Title: coronavirus pandemic pakistan stands with india top trend in pakistan scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 निव्वळ प्रेम… मुंबई पोलिसांनी घरीच वाढदिवस साजरा करणा-याला पाठवला केक
2 कामावरील निष्ठा… गरोदर असतानाही महिला DSP काठी हातात घेऊन करोना बंदोबस्तात ऑन ड्युटी
3 “माफ करा, चूक झाली” सांगत चोरानं परत केल्या १७०० लसी
Just Now!
X