जगभरातील १८० हून अधिक देशामध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. अनेक देशांना करोनाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्याच करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अनेक देशांनी नागरिकांनी मदतसाठी पुढे येण्याचे आवाहन केलं आहे. भारतामध्येही राज्य पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर सहाय्यता निधी गोळा करण्यासाठी सामान्यांनी पुढे यावे असं आवाहन सरकारी यंत्रणांनी केल आहे. देशामधील अनेक ठिकाणी स्थलांतरीत कामगार तसेच गरीब जनतेला लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. हातावर पोट असणाऱ्यांना सेवाभावी संस्था तसेच राज्य सरकारांच्या माध्यमातून मदत केली जात आहे. अनेक कंपन्या तसेच सेवाभावी संस्थांनी पुढे येत आपल्या पद्धतीने समाजातील गरजूंना मदत करताना दिसत आहे. कोणी अन्नदान करत आहे तर कोणी सहाय्यता निधीसाठी पैसे देत आहे. मात्र तेलंगणामध्ये एका चक्क एका गरीब सफाई कर्मचाऱ्याने आपला दोन महिन्याचा पगार मदत निधी म्हणून दिला आहे.

तेलंगणामधील एका सफाई कर्मचाऱ्याने त्याचा दोन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी पैसे देण्यासंदर्भातील आवाहनाला प्रतिसाद देत या सफाई कामगाराने आपला दोन महिन्याचा पगार म्हणजेच १७ हजार रुपये सहाय्यता निधीला दिले आहेत.

तेलंगणाचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री के.टी रामा राव यांनी ट्विटवरुन या कर्मचाऱ्याचे कौतुक केलं आहे. “माझ्या राज्यातील सामान्य नागरीक हेच खरे हिरो आहेत. आज बोंथा साई कुमार या उत्तनूरमधील सफाई कामगाराने त्याच्या दोन महिन्याचा पगार १७ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले,” असं राव यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटसोबत त्यांनी हा तरुण अधिकाऱ्यांकडे १७ हजारांचा धनादेश देतानाचा फोटोही ट्विट केला आहे.

मंत्र्यांनी हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांनी या तरुणाचे कौतुक केलं आहे. पाहूयात काय म्हणाले आहेत लोकं या तरुणाबद्दल बोलताना…

त्यालाच गरज असेल तर

भ्रष्टाचार करणाऱ्यांनी धडा घ्यावा

देव तुझं भलं करो…

मस्त…

पैसे घेऊ नका त्याला बक्षिस द्या…

दादा तुझा अभिमान वाटतो

खरा सैनिक

अडीच हजारहून अधिक जणांनी या ट्विटला लाइक केलं आहे.