30 September 2020

News Flash

Video : करोनाचा धसका; टॉयलेट पेपरवरुन दोन महिलांमध्ये हाणामारी

करोना वायरसपासून वाचण्यासाठी वाट्टेल ते; महिलांनी केली टॉयलेट पेपरसाठी हाणामारी

करोना वायरसने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला चीनमधून फैलावलेला हा विषाणू आता ९०पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. करोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या विषाणूमुळे लोकांमध्ये इतकी दहशत पसरली आहे, की यापासून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार आहेत. दरम्यान अशीच एक आवाक् करणारी घटना ऑस्ट्रेलियामध्ये घडली. येथे दोन महिलांनी करोनाच्या दहशतीखाली चक्क टॉयलेट पेपरसाठी हाणामारी केली.

करोना वायरस आणि टॉयलेट पेपरचा संबंध काय?

करोना विषाणूमुळे ऑस्ट्रेलियात तोंडाला लावायच्या माक्सची मागणी वाढली. अचानक वाढलेल्या मागणीमुळे माक्सची कमतरता भासू लागली. त्यामुळे लोकांनी मग टिशू पेपर आणि काही लोकांनी तर टॉयलेट पेपरचा सुद्धा माक्स म्हणून वापर करण्यास सुरुवात केली.

या पार्श्वभूमीवर एक आवाक् करणारी घटना एका दुकानात घडला. त्या दुकानात टॉयलेट पेपरचे शेवटचे पाकिट उरले होते. आणि ते पाकिट मिळवण्यासाठी दोन महिलांनी चक्क हाणामारी केली. त्यांनी एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत मारामारी केली. त्यांच्या या भाडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एखाद्या विशाणूपासून वाचण्यासाठी लोक काय करुन शकतात याचं एक जिवंत उदाहरण म्हणून या व्हिडीओकडे पाहिले जात आहे.

काय आहे कोरोना व्हायरस? कशी घ्याल काळजी

कोरोना व्हायरस सार्स’मध्ये (SARS) जागतिक साथीचा रोग म्हणून आधीच ओळखले गेले आहे, ज्यामुळे आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळले. सध्याच्या माहितीनुसार, जलचर जीव अशा प्रकारचे विषाणू संक्रमित करण्याचे ज्ञात नाही, म्हणूनच सीफूडपासून हा वायरस उद्भवण्याची शक्यता नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये, मानवी संक्रमणाची ओळख पटली गेली आहे. सर्वांत प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे. पारंपारिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे. तरीही आतापर्यंत यावर, कोणतेही अँटिबायोटिक किंवा लस उपलब्ध नाही, म्हणूनच उपचार पूर्णपणे नैसर्गिक आधारावर केले जात आहेत.

संसर्गजन्य रोगांच्या पहिल्या तत्त्वांमध्ये, सर्वात वाईट बग्स मानवी संपर्काचे चक्र तोडून किंवा निर्जंतुकीच्या स्थितीत संपर्क राखून असतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याला एखाद्या संसर्गाची सुरूवात झाली आहे, तर तुम्ही डॉक्टरांना किंवा जवळच्या रुग्णालयात जाऊन भेट देणे गरजेचे आहे. निदान होईपर्यंत किंवा लक्षणांचे निराकरण होईपर्यंत स्वत: ला इतरांपासून दूर ठेवा. प्रभावित क्षेत्रांचा प्रवास करणे किंवा त्या भागातील लोकांशी संपर्क साधणे केवळ सरकारी सल्लामसलत किंवा तपासल्यानंतरच करावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 12:19 pm

Web Title: coronavirus two women fight over pack of toilet paper mppg 94
Next Stories
1 स्मृतीदिन विशेष: जाणून घ्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंबद्दलच्या खास गोष्टी
2 Video: “Go Corona… Go Corona”, रामदास आठवलेंची चिनी नागरिकांसोबत घोषणाबाजी
3 करोनावर उपाय शोधण्यासाठी चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला मुस्लिमबहुल प्रांताचा दौरा?
Just Now!
X