22 October 2020

News Flash

करोना व्हायरसकडून शी जिनपिंग यांना ‘हॅपी फादर्स डे’; भन्नाट कार्टून व्हायरल

एका वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाले आहे हे व्यंगचित्र

Photo: Twitter/Bhairavinachiya

जगभरामध्ये २१ जून रोजी फादर्स डे मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. इतर अनेक डेज आणि सणांप्रमाणेच फादर्स डेवरही करोनाचे सावट असल्याचे दिसून आलं. मात्र याच करोनाच्या पार्श्वभूमीवर एका तमिळ वृत्तपत्राने एका हटके व्यंगचित्राच्या माध्यमातून फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्यंगचित्राच्या माध्यमातून थेट चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.

भैरवी या महिलेने हे चित्र ट्विटरवर शेअर केलं आहे. वर्तमानपत्रामधील व्यंगचित्राचा फोटो काढून पोस्ट केला आहे. या फोटोला तिने ‘हे कोणी पाहिले आहे?’ अशी कॅप्शन दिली आहे.

काय आहे या व्यंगचित्रामध्ये

तमिळ वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या या व्यंगचित्रामध्ये करोना विषाणू हा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना गुलाब देत आहे. ‘हॅपी फादर्स डे’ अशा शब्दांमध्ये हा विषाणू जिनपिंग यांना शुभेच्छा देत आहे. या फोटोमध्ये जिनपिंग यांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव दिसत आहेत. हे व्यंगचित्र १०० हून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे.

चीनमध्ये असणाऱ्या हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी असलेल्या वुहान येथून करोना विषाणूचा जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये प्रादुर्भाव झाला. चीनमध्ये मे महिन्यापर्यंत एकूण चीनमध्ये करोनाने ४ हजार ६३३ जणांचा बळी गेला होता. मात्र करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेने चीनच्या बेजबाबदार वागण्यामुळे जगभरामध्ये करोनाचा फैलाव झाल्याचा आरोप अनेकदा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा चीनवर यासंदर्भात निशाणा साधला आहे. मात्रमध्ये आता नव्याने करोनाचे रुग्ण आढळून येत असल्याचे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 3:27 pm

Web Title: coronavirus wishes happy fathers day to china president xi jinping scsg 91
Next Stories
1 Viral Video : भुंकणाऱ्या कुत्र्याला रागाच्या भरात लाथ मारायला गेला अन्…
2 Viral Video: पाणी पिणाऱ्या हरिणावर मगरीने केला हल्ला अन् त्याच क्षणी…
3 Video: सुशांतच्या लाडक्या ‘फज’ला काय करावं कळेना; सुशांतला शोधत घरभर फिरतो आणि…
Just Now!
X