आपल्यापैकी अनेकजण हे लग्नाचं आमंत्रण म्हणजे जेवणाचं आमंत्रण असं मजेत म्हणतात. अनेकजण तर आम्ही केवळ जेवणासाठी लग्नाला जातो असंही सांगतात. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असलं तरी प्रेमाचा मार्ग पोटातून जातो असं म्हणणारे अनेकजण केवळ छान जेवणासाठी लग्नाला आवर्जून येतात असंच अनेक चर्चांमधून दिसून येतं. मागील काही वर्षांमध्ये लग्नसमारंभातील जेवणामध्ये मोठा बदल झाल्याचं दिसून येत आहे. पारंपारिक पद्धतीपेक्षा वेगळ्या प्रयोगांना प्राधान्य दिलं जात असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. अशीच एक चर्चा सध्या सोशल नेटवर्किंगवर रंगलीय ती म्हणजे एका लग्नातील मॅगी काऊंटरची.

नक्की वाचा >> बिस्कीट समजून खाल्ल्या Amazon वरील ‘शेणाच्या गोवऱ्या’; भन्नाट Product Review झाला व्हायरल

हल्ली हॉल किंवा लॉनवर होणाऱ्या लग्न समारंभांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे काऊंटर लावले जातात. यामध्ये अगदी चाट पापडीपासून ते पाणीपुरीपर्यंतच्या अनेक पदार्थांच्या काऊंटर्सचा समावेश असतो. अनेकदा हे काऊंटर सुरु झाल्यानंतर तेथे पाहुण्याची मोठी गर्दी पाहायला मिळते. हल्ली तर अनेक ठिकाणी कोरियन, थाय आणि इतर पद्धतीच्या पदार्थांचेही काऊंटर दिसून येतात. मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चा रंगलीय ती एका भारतीय लग्नामध्ये ठेवलेल्या मॅगी काऊंटरची.

नक्की वाचा >> लॉटरी विक्रेताच झाला करोडपती; न विकल्या गेलेल्या तिकीटालाच लागली १२ कोटींची लॉटरी

सौम्या लखानी नावाच्या एका तरुणीने तिच्या चुलत भावंडाच्या लग्नामधील एक फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. यामध्ये लग्नाच्या ठिकाणी एक फूड काऊण्टर केवळ मॅगी नूडल्ससाठी देण्यात आल्याचा तिने म्हटलं आहे. या ट्विटमध्ये तिने या काऊण्टरचा फोटोही ट्विट केलाय. “एवढा विचार करुन प्लॅनिंग करत लग्नाच्या ठिकाणी मॅगी काऊंटर ठेवल्यामुळे मला माझ्या भावाबद्दल जरा जास्तच प्रेम वाटू लागलंय,” असं सौम्या म्हणते. तिने शेअऱ केलेल्या फोटोमध्ये मॅघी काउण्टरवर मॅगीचे छोटे छोटे पॅक्स ठेवल्याचे दिसत आहे. या काऊण्टवर एक स्टोव्ह, नॉन स्टॅक पॅन आणि मॅगी बनवण्यासाठी लागणाऱ्या इतर गोष्टींसोबतच आलेल्या पाहुण्यांना गरमागरम मॅगी देण्यासाठी एक कॅटरसचा कर्मचारीही उभा असल्याचे दिसत आहे.

अनेकांनी या फोटोवर कमेंट करुन याच काऊण्टरवर मुलांची भरपूर गर्दी झाल्याचं म्हटलं आहे. त्यावर सौम्याने लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही या काऊण्टरवर गर्दी केल्याचं सांगितलं. काहींनी नक्की हे लग्न कुठे झालं, कॅटरस कोणं होतं असे प्रश्न विचारलेत. तर काहींनी ही कल्पना ज्याच्या डोक्यातून आली त्याला सलाम केलाय.