News Flash

एका लग्नाची अनोखी गोष्ट… लॉकडाउनच्या काळात सीमेवरच पार पडला निकाह

लॉकडाउनमुळे अत्यंत महत्वाच्या कामाशिवाय राज्याबाहेर जाण्याची परवानगी नाही.

संग्रहित छायाचित्र

करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात लॉकडाउन घेण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे राज्याबाहेर जाण्याची परवानगी नाही. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील वधू आणि उत्तराखंडमधील वर यांनी लग्नासाठी परवानगी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही राज्यांनी त्यांना राज्याबाहेर जाण्याची परवानगी नाकाराली. त्यामुळे दोघांनीही राज्यांच्या सीमेवरच लग्न केलं.

उत्तराखंडमधील कोठी कालोनीमधील मोहम्मद फैसल याचं लग्न उत्तर प्रदेशमधील बिजनौरच्या नगीनासोबत जमलं होतं. लग्नाची तारीखही ठरलेली पण लॉकडाउनमुळे सर्वकाही बिघडलं. मग नवरदेव आणि नवरीने सामंजस्याने दोन्ही राज्याच्या सीमेवरच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आयशाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, नवरदेव वरात घेऊन बुधवारी येणार होता. पण लॉकडाउनच्या नियमांमुळे वधू पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये येण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. त्यावेळी दोन्ही कुटुंबातील जानत्या लोकांनी ठरलेल्या वेळीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दोन्ही राज्याच्या प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन सीमेवरच लग्न झाले. विशेष म्हणजे लग्नाला दोन्ही राज्यातील पोलिसांनी उपस्थिती दर्शवली होती.

दरम्यान, करोना विषाणूमुळे संक्रमित होणाऱ्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख १५ हजार झाली आहे. गेल्या आठवड्यापासून देशात दररोज चार हजार ते सहा हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी त्यावर मात करणाऱ्यांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे. एकूण संख्येच्या ४० टक्के रूग्णांनी करोनाचा पराभव केला आहे. भारतीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 4:42 pm

Web Title: couple gets married at up uttarakhand border due to coronavirus lockdown nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 जबरदस्त! सहा वर्षाच्या चिमुरड्याने उलगडला आठ वर्षांपूर्वी घडलेला गुन्हा, पोलिसही चक्रावले
2 Video: आता मॉलमध्ये हाताने नाही पायाने बोलवा लिफ्ट; संसर्ग टाळण्यासाठी लिफ्टमध्ये बटणाऐवजी पेडल
3 Viral Video : जंगल सफारीदरम्यान सिंहिणीने गाडीचा दरवाजा उघडला अन्…
Just Now!
X