22 April 2019

News Flash

‘या’ जोडप्याला ठाऊक आहे लॉटरीची ट्रिक, आतापर्यंत जिंकले १८६ कोटी

दांपत्याच्या लॉटरी विजयाच्या ट्रिकवर आता हॉलिवूडवाले चित्रपट बनवणार आहेत

(संग्रहित छायाचित्र)

अमेरिकेतील मिशिगनमधील एका दांपत्याने आतापर्यंत अनेकवेळा लॉटरी जिंकली आहे. या लॉटरीमधून त्यांनी तब्बल १८६कोटी रूपये कमावले आहेत. या दांपत्याच्या लॉटरी विजयाच्या ट्रिकवर आता हॉलिवूडवाले चित्रपट बनवणार आहेत. निवृत्त असणाऱ्या दापंत्याने वृत्तवाहिनीवरील शो दरम्यान लॉटरी जिंकण्याच्या ट्रिकचा खुलासा केला आहे.

आ दापत्यंचे नाव जेरी सेल्बी आणि मार्ज सेल्बी असे आहे. सामान्य अंकगणिताच्या साह्याने या दापंत्याने अनेकवेळा लॉटरी जिंकली आहे. त्यांनी आपल्या कुटुंबिय आणि मित्रांनाही या ट्रिकच्या वापर करून लॉटरी लावण्याचा सल्ला दिला आहे. या दापंत्याच्या या अनोख्या शैलीवर चित्रपट तयार करण्यासाठी हॉलिवूडमधील निर्मात्यांनी राइट्स खरेदी केले आहेत. जेरी आणि मार्ज या दांपत्याने तब्बल सहा वर्षापर्यंत लॉटरीची तिकीटे विकत घेतली. प्रत्येकवेळी लॉटरी जिंकत ते कोट्यधीश झाले आहेत.

पतीने मिशिगन विद्यापिठातून गणितामधून पदवी घेतली आहे. पहिल्यांदा ज्यावेळी त्याच्या हातात लॉटरीचे तिकीट आले त्यावेळी त्याने अंकगणिताचा फॉर्मुल्याचा वापर केला. लॉटरी लागण्यापूर्वी हे दांपत्य १७ वर्षांपासून किराणा दुकान चालवत होते. पण २००३ मध्ये त्यांनी दुकान बंद केले.

काय आहे फॉर्मुला?

५० लाख डॉलरचा जॅकपॉट जर कोणी जिंकला नाही तर ते पैसे अन्य लॉटरीवाल्यांना दिले जातात. ज्याच्या लॉटरीचे आधिकाधिक क्रमांक जुळतात अशा तीन-चार जणांना ५० लाख डॉलर वाटले जातात आणि हेच लक्षात घेऊन हे दांपत्य शेकडो तिकीट विकत घेत असे. प्रत्येकवेळी त्यांना तिकिट विकत घेतलेल्या रकमेपेक्षा दुप्पट पैसे मिळत.

First Published on February 5, 2019 3:56 pm

Web Title: couple reveal trick that helped them won crores of rupees in state lotteries