News Flash

करोनाग्रस्त असूनही हॉस्पिटलमध्येच CA च्या परीक्षेची तयारी, IAS अधिकारी म्हणतात : ‘यश योगायोगाने मिळत नाही’

"जर एखाद्या गोष्टीसाठी तुमचं समर्पण असेल तर दुःख विसरायला मदत होते...त्यानंतर यश केवळ औपचारिकता म्हणून उरतं...."

(फोटो सौजन्य - @Vijaykulange ट्विटर अकाउंट)

करोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे लोकं दहशतीत आहेत, परंतु या संकटाच्या परिस्थितीतही काहीजण त्यांचं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर्पित आहेत. करोनाची लागण झालेली असतानाही कठोर परिश्रम घेत आहेत. अशाच एका रूग्णाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो रुग्णालयातच परीक्षेची तयारी करत आहे.

ओडिशाच्या गंजम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व आयएएस अधिकारी विजय कुलांगे यांनी या तरुणाचा फोटो शेअर केला आहे. मास्क घालून हॉस्पिटलच्या बेडवरच पुस्तक आणि कॅलक्युलेटर वगैरे ठेवून तो अभ्यास करत असल्याचं फोटोमध्ये दिसतंय. विजय कुलांगे यांनी एमकेसीजी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचा अलिकडेच दौरा केला, त्यावेळी त्यांनी आपल्या ट्विटरवर हा फोटो शेअर करत रुग्णाचं कौतुक केलं. “यश योगायोगाने मिळत नाही, त्यासाठी समर्पणाची आवश्यकता असते” अशा आशयाचा संदेशही त्यांनी या फोटोसोबत लिहिला. “मी कोविड रुग्णालयाचा दौरा केला आणि या तरुणाला सीए परीक्षेची (चार्टर्ड अकाउंटंट्स) तयारी करताना बघितलं. जर एखाद्या गोष्टीसाठी तुमचं समर्पण असेल तर दुःख विसरायला मदत होते…त्यानंतर यश केवळ औपचारिकता म्हणून उरतं….”, असा संदेश कुलांगे यांनी दिला.


२८ एप्रिल रोजी कुलांगे यांनी या तरुणाचा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. अनेकजण तरुणाच्या जिद्दीचं कौतुक करत असून भविष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. करोनाच्या संकटकाळात स्वतःला करोनाची लागण झालेली असतानाही परीक्षेची तयारी करणाऱ्या या तरुणाची जिद्द आणि चिकाटी पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 10:51 am

Web Title: covid patient prepares for ca exam in odisha hospital picture goes viral sas 89
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “…वेळ वाया घालवला नाही”, सीएम उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीचं आनंद महिंद्रांकडून कौतुक
2 खरोखर RSS च्या वयस्कर स्वयंसेवकाने करोना रुग्णासाठी बेड सोडला का?; जाणून घ्या काय घडलं?
3 रुग्णालयासमोर लग्नाची वरात पाहून रुग्णवाहिका चालकाने केलं असं काही; सगळेच झाले अवाक
Just Now!
X