05 March 2021

News Flash

गायीनं श्वानाच्या पिलांना केलं स्तनपान; व्हायरल व्हिडीओनं जिंकली मनं

गायीच्या ममत्वाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

गायीच्या ममतेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भूकेल्या श्वानाच्या पिलांना गायीनं स्तनपान केल्याचा हा व्हिडीओ सर्वांचं मन जिंकत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक सकारात्मक कमेंट केल्या असून पसंती दर्शवली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, गाय झोपलेली असून श्वानाची चार पिल्ली स्तनपान करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला इंडियन फॉरेस्ट सर्विसचे आधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केला आहे. त्यांनी या व्हिडीओला छान असं कॅप्शनही दिलं आहे. ‘आई स्वर्गदूत आहे. आपल्या आणि ईश्वराच्या बाळात ती कोणतेही अंतर ठेवत नाही.’

इंडियन फॉरेस्ट सर्विसचे आधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ २३ जुलै रोजी ट्विटरवर पोस्ट केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला दोन हजार पेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. तर ६०० पेक्षा जास्त जणांनी लाइक्स आणि १२० पेक्षा जास्त जणांनी रिट्विट आणि कमेंट केल्या आहेत. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 3:13 pm

Web Title: cow gave milk to dogs hungry children video is going viral nck 90
Next Stories
1 Best Couple : ‘हे’ दोघं चार वर्षांपासून एकत्र फिरतात; फोटोग्राफरनेच सांगितला व्हायरल फोटोचा किस्सा
2 एका पक्ष्यासाठी तामिळनाडूतलं गाव ३५ दिवस अंधारात, जाणून घ्या प्रेरणादायी कहाणी
3 चहावाल्याच्या डोक्यावर बँकेचे ५० कोटींचे कर्ज? जाणून घ्या काय आहे प्रकरण…
Just Now!
X