बिहारमधील एका शाळेतील विद्यार्थी प्रवेश शुक्ल न भरता कचरा गोळा करतात आणि शिक्षण घेतात. गया जिल्ह्यातील पदमपानी असे या शाळेत पर्यावरण वाचवण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवला आहे. शाळेच्या कमिटीने विद्यार्थांमध्ये पर्यावरण प्रति जागृती निर्माण व्हावी म्हणून या उपक्रमाला सुरूवात केली आहे. कचरा गोळा केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क आणि पुस्तके देण्यात येत आहेत.

पदमपानी शाळेचे उपमुख्याध्यापक दीपक कुमार यांनी या अनोख्या उपक्रमाबद्दल एएनआयला मुलाखत दिली. यामध्ये ते म्हणतात, २०१४ मध्ये पदमपानी शाळेची सुरूवात झाली. त्यावेळी शाळेत जवळपास २५० विद्यार्थी होते. तेव्हापासून आम्ही विद्यार्थांना मोफत शिक्षण, पुस्तके आणि दुपारचं जेवण देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून विद्यार्थांना सांगण्यात आले की, शाळेत येताना प्रवेश शुल्काऐवजी कचरा आणायचा आणि शाळेबाहेरील डस्टबिनमध्ये जमा करायचे आवाहन करण्यात आले.

विद्यार्थांनी जमा केलेला कचरा एकत्रित करून रिसाइकलिंगला पाठवण्यात येतो. विद्यार्थांना पर्यावरणप्रेमी जागरूक रहावे हा यामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेच्या परिसरातील २०० झाडांची देखभालही केली जाते.

पदमपानी शाळा डोनेशनवर चालत असल्याचे शाळेचे निर्माते मनोज समदर्शी यांनी सांगितले. ते म्हणाले की, शाळेच्या आसपास असणारा सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आमचे लक्ष आहे. शाळेत शिकणारे अनेक विद्यार्थी गरीब घरातील आहेत. या विद्यार्थांना क्रीडा शिक्षणाबरोबरच अन्य सामाजिक गोष्टींचेही ज्ञान दिले जाते.

पर्यावरण वाचवण्यासाठी आम्ही खास स्वच्छता अभियानात सहभागी झालो आहेत. प्रवेश शुक्लाऐवजी आम्ही आजूबाजूला असणारा कचरा गोळा करतो आणि शाळेबाहेरील डस्टबिनमध्ये टाकतो. तो कचरा शाळेमार्फत रिसाइकलिंगला पाठवण्यात येतोय. आम्हाला शिक्षणाशिवाय पर्यावरण जागृतीही शिकवली जाते, असे पदमपानी शाळेतील एका विद्यार्थाने सांगितले.