15 December 2019

News Flash

जावईबापू नाराज ! शून्यावर बाद झालेला शोएब मलिक सोशल मीडियावर ट्रोल

हार्दिक पांड्याने घेतला मलिकचा बळी

मँचेस्टरमध्ये झालेल्या लढतीत भारताने पाकिस्तानवर मात करत, विश्वचषक लढतीत आपलं विजयी अभियान कायम राखलं. ३३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानी संघाला अनेकदा पावसाचा फटका बसला. त्यातच भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत पाकिस्तानी फलंदाजांना अक्षरशः नाकीनऊ आणलं. पाकिस्तानचा भरवशाचा खेळाडू शोएब मलिकही काल फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही.

हार्दिक पांड्याने शोएब मलिकला शून्यवरच त्रिफळाचीत केलं. यानंतर सोशल मीडियावर शोएब मलिक नेटीझन्सकडून चांगलाच ट्रोल झाला.

Just Now!
X