भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा मुलगा अगस्त्य हा आता तीन महिन्यांचा झाला आहे. हार्दिक आणि नताशा हे दोघंही सोशलं मीडियावर फार सक्रिय असतात. अगस्त्य तीन महिन्यांचा झाल्याच्या आनंदात नताशानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्यासह काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. अगस्त्य आणि नताशा यांचे फोटो नेटकऱ्यांच्या फार पसंतीस उतरत आहेत.
फोटोंमध्ये नताशा काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. तीनं शेअर केलेल्या फोटोंवर हार्दिक पांड्यानंही कमेंट केल्या आहे. “मी तुम्हा दोघांनाही मिस करतोय,” असं हार्दिक पांड्यानं लिहिलं आहे. हार्दिक पांड्या सध्या आयपीएल स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहे.
View this post on Instagram
नताशानं शेअर केलेल्या फोटोंना अनेकांची पसंती मिळत आहे. नताशानं ३० जुलै रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. नताशा ही सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती अगस्त्यसोबतचे व्हिडीओदेखील शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी तिनं टीव्हीवर मॅच पाहताना आणि हार्दिकला चिअर करताना एक फोटो शेअर केला होता. त्यात अगस्त्य देखील मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 31, 2020 3:29 pm