14 August 2020

News Flash

धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हार्दिक पांड्या थेट रांचीला, व्हिडीओ व्हायरल

खासगी जेट विमानाने पांड्या पोहचला रांचीत

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज जगभरातून लाखो चाहते आणि त्याचे सहकारी शुभेच्छांचा वर्षावर करत आहे. सध्या लॉकडाउन काळात धोनी आपल्या परिवारासोबत रांची येथील फार्महाउसवर राहत आहे. मात्र भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आपल्या लाडक्या खेळाडूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट रांचीला पोहचला आहे. सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा रांची एअरपोर्टचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

हार्दिक पांड्या आपली गर्लफ्रेंड आणि भाऊ कृणाल पांड्यासोबत बडोद्यावरुन खासगी जेट विमानाने बडोद्यावरुन रांचीला पोहचला. हार्दिक पांड्याच्या कारकिर्दीत धोनीचा महत्वाचा वाटा आहे. भारतीय संघात अनेक खडतर प्रसंगी धोनीने हार्दिकला आपला पाठींबा दर्शवला आहे. याच कारणासाठी पांड्या धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट रांचीला पोहचला.

View this post on Instagram

Let The Celebrations Begin !!

A post shared by MS Dhoni Fans Club (@dhoni.bhakt) on

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीला मैदानात पाहण्यासाठी चाहते आतूर झाले होते, परंतु करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे धोनीचं पुनरागमन लांबणीवर पडलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 8:54 pm

Web Title: cricketer hardik pandya with his brother kurnal reach ranchi to celebrate ms dhoni birthday video goes viral psd 91
Next Stories
1 T-20 WC : मेलबर्नमध्ये पुन्हा लॉकडाऊन, आता तरी निर्णय घ्या ! बीसीसीआयचा आयसीसीला टोला
2 जाहीरातींना नकार, धोनी रमला सेंद्रीय शेतीत ! नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करण्याकडे देतोय लक्ष
3 लाडक्या बाबांसाठी झिवाने दिलं गोड गिफ्ट, व्हिडीओ पाहा… तुम्हीही प्रेमात पडाल
Just Now!
X