16 December 2017

News Flash

मुरली विजयला पुत्ररत्न, मित्राच्या गर्भवती पत्नीसोबत केला होता विवाह

पहिला दुसऱ्याची ओळख करुन देतोय

ऑनलाइन टीम | Updated: October 3, 2017 12:03 PM

दोन रॉकस्टार असे सांगत मुरली विजयने आपल्या मुलाचा फोटो शेअर केला आहे.

भारतीय क्रिकेटर मुरली विजयची पत्नी निकिताने तिसऱ्या मुलाला जन्म दिला. मुरलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. मोठ्या मुलाने गोंडस बाळाला हातात घेतलेला एक फोटो मुरलीनं ट्विट केलाय. दोन रॉकस्टार असल्याचे सांगत पहिला दुसऱ्याची ओळख करुन देतोय, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. मुरली विजयचे हे तिसरे अपत्य आहे. २०१२ मध्ये त्याने क्रिकेटच्या मैदानातील आपल्या पार्टनरच्याच पत्नीला आयुष्याची जोडीदार म्हणून निवडले होते. निकिता गर्भवती असताना त्याने तिच्याशी विवाह केला होता. या दोघांना एक मुलगा आणि मुलगी आहे.

यापूर्वी निकिताचा दिनेश कार्तिकसोबत २००७ मध्ये विवाह झाला होता. २०१२ मध्ये रंगलेल्या आयपीएलदरम्यान निकिता पती दिनेश कार्तिकसोबत होती. यादरम्यानच निकिता आणि मुरली विजयची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. निकिता आणि मुरली विजयचे प्रेमप्रकरण लक्षात आल्यानंतर कार्तिकने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी दिनेश कार्तिकने निकिताला सोडचिठ्ठी दिली, त्यावेळी ती गर्भवती होती. कार्तिकने होणाऱ्या मुलावर कोणताही हक्क सांगितला नाही. त्यानंतर निकिता आणि मुरली विजयने लग्न केले. तर दिनेश कार्तिकने दीपिका पल्लीकलशी विवाह केला.

चेन्नईच्या ३३ वर्षीय मुरली विजयने भारतीय संघाकडून ५१ कसोटी सामने, १७ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. २००८ मध्ये नागपूरच्या मैदानातून ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने ५१ कसोटीत ४६.३० च्या सरासरीनं ३४०८ धावा केल्या आहेत. यात ९ शतकं आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. १६७ ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.

 

First Published on October 3, 2017 12:01 pm

Web Title: cricketer murali vijay became father nikita dinesh karthik social media