22 January 2021

News Flash

युवराजने खरेदी केली BMWची अफलातून बाईक

युवराज सिंगने २.९९ लाख रूपयांमध्ये BMW बाईक खरेदी केली आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. बाईकवरील त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. युवराज सिंगने २.९९ लाख रूपयांमध्ये BMW G ३१० Rही अफलातून बाईक खरेदी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बाईकची भारतीय बाजरपेठेमध्ये प्रतीक्षा केली जात होती.

युवराज सिंगचे बाईकसोबतचे फोटोवर सध्या नेटीझन्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार भारतामध्ये ही बाईक खरेदी करणारा युवराज पहिला ग्राहक आहे. त्यामुळे युवराज सिंगची याबाबत आधीक चर्चा होत आहे. युवरजाने बाईकच्या शोरूममध्ये जाऊन स्वत: बाईकची डिलव्हरी घेतली आहे. युवराजकडे आधीच BMW X6 M, Audi Q5, BMW 3 Series, Bentley Continental Flying Spur सारख्या महागड्या कारही आहेत. काही वर्षांपूर्वी युवराजने Lamborghini Murcielago ही कारही खरेदी केली आहे. तसेच त्याच्याकडे E46 BMW M3 ही कर्न्व्हटेबल कारही आहे.

BMW G ३१० R ही बाईक कंपनीने टीव्हीएससोबत तयार केली आहे. या बाईकमध्ये ३१३ सीसीचे सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन ३४ बीएचपीची पॉवर आणि २८एनएमचा टॉर्क जनरेट करतं. या इंजिनसोबत ६ स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहेत. तसेच ड्युअल-चॅनल एबीएस सुद्धा देण्यात आलं आहे. या बाईकचा वेघ ताशी १४३ किमी आहे. तसेच या बाईकमध्ये ११ लीटरचा टॅंक आहे.

BMW G ३१० R या बाईकला कंपनीने २०१५ मध्ये लाँच केले आहे. भारतामध्ये लाँचिगपूर्वी कंपनीने आपले नेटवर्क मजबूत केले आहे. या कंपनीचे भारतात सात डिलरशिप आहेत. यामध्ये नवी दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद आणि कोचीचा समावेश आहे. लवकरच कोलकाता आणि चंदिगढमध्ये डिलरशीप दिली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 4:47 am

Web Title: cricketer yuvraj singh takes delivery of the bmw g 310 r
Next Stories
1 ..तरीही भारत अव्वल स्थानी
2 अँडरसनची प्रतिस्पर्धी फलंदाजांवरील दहशत कायम राहावी – जो रूट
3 वादग्रस्त व्यंगचित्राद्वारे सेरेनावर ऑस्ट्रेलियातही कडाडून टीका
Just Now!
X