डेअरी मिल्क म्हणजे चॉकलेट हे भारतीयांसाठी जणू समिकरणच झाले आहे. याच डेअरी मिल्क कंपनीने १५ ऑगस्टनिमित्त भारतामधील विविधतेमध्ये एकता आहे हे दाखवण्यासाठी एक स्पेशल एडिशन चॉकलेट बाजारामध्ये आणले. मात्र आता ‘अॅडएज’ नावाच्या वेबसाईटने लिहिलेल्या एका लेखामुळे या जाहिरातीवरुन कंपनीवर चांगली टिका झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचवेळी दुसरीकडे अनेकांनी ही उत्तम जाहिरात असून यावरुन वाद का निर्माण केला जात आहे असा सवाल उपस्थित केला आहे.

युनिटी बार नावाने कॅटबरीने हे चॉकलेट बाजारात आणले. डार्क चॉकलेटपासून ते व्हाइट चॉकलेटपर्यंत सर्व प्रकारच्या रंगाचे चॉकलेट एकाच बारमध्ये असलेल्या या विशेष कॅटबरीची जाहिरात कंपनीने सोशल नेटवर्किंगवर केली होती. डार्क, ब्लेंडेड, मिल्क आणि व्हाइट अशा चार प्रकारचे चॉकलेट एकाच बारमध्ये समावेश करण्यात आलेल्या या कॅटबरीच्या माध्यमातून भारतातील एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न कंपनीने केला.

मात्र अनेकांना कॅटबरीची ही कल्पना पटली नाही. अनेकांनी कंपनीवर वर्णद्वेषाचा आरोप करत त्यांना ट्रोल केले. पाहूयात काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे.

१)
वर्णद्वेषावरुन जाहिरात

२)
प्रश्नच सोडवला

३)
मग रंगाचा फरक का

४)
ट्विट वाचल्यावर

५)
याबद्दल मार्टीन ल्यूथर किंग म्हणाले होते

६)
याने काय होणार

असे असले तरी दुसरीकडे कंपनीची बाजू घेतानाही अनेकजण दिसत आहेत.

१)
वाद झाल्यावर इकडे पाठवा

२)
इकडे पण हवी ही कॅडबरी

३)
छान आहे कल्पना

४)
जगभरात हवी

५)
मी जातोय चॉकलेट घ्यायला