News Flash

राजकुमाराच्या नजरेतून दुबई दर्शन

दुबई हरवली धुक्यात

राजकुमाराने कॅमेरात कैद केलेल्या स्वप्ननगरीचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केले आहे.

दुबईचे राजकुमार शेख हमदन बिन मोहम्मद अल मक्तूब यांनी आपल्या कॅमेरात दुबईचे विहंगम दृश्य कैद केले आहे. उंचच उंच इमारती आणि श्रीमंत अशी दुबई एका राजकुमाराच्या नजरेतून कशी दिसते हे बघायला प्रत्येकालाच आवडेल म्हणूनच या राजकुमाराने कॅमेरात कैद केलेल्या स्वप्ननगरीचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केले आहे.

वाचा : अन् सौदीच्या वाळवंटात होऊ लागली बर्फवृष्टी

दुबईमधल्या तापमानाचा पारा खाली उतरला आहे. गेल्याच आठवड्यात दुबईच्या अनेक वाळवंटी भागात बर्फवृष्टी झाली होती. तर याआठवड्याच्या सुरूवातीपासून दुबईत धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे अनेक ठिकाणीची दृश्यता कमी झाली आहे. या धुक्यात दुबई हरवली आहे. अशावेळी दुबईचे राजपुत्र शेख हमदन बिन मोहम्मद अल मक्तूब यांना हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद करण्याचा मोह अनावर झाला आहे. त्यांनी धुक्यात हरवलेल्या दुबईचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. राजपुत्र शेख हमदन बिन यांनी स्वत: कॅमेरा हातात घेऊन याचे छायाचित्रण केले आहे. इतकेच नाही तर एका फोटामध्ये ते थंडगार वातावरणात कॉफी पिण्याचाही आनंद घेतानाही दिसत आहेत.

राजकुमार शेख हमदन बिन मोहम्मद अल मक्तूब हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर तर त्यांचे ४४ लाखांहूनही अधिक फॉलोअर्स आहेत. दुबईमध्ये हवामानातील बदलामुळे तापमानात घट होत आहे. गेल्या आठड्यात अनेक भागातील तापमान उणे दोन अंश सेल्शिअसच्याही खाली पोहचले आहे. त्यामुळे अनेक भागात बर्फवृष्टी देखील झाली आहे. त्यावेळी लोकांनी रस्त्यावर उतरुन या बर्फवृष्टीचा आनंद घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 6:07 pm

Web Title: crown prince of dubai sheikh hamdan share dubais most beautiful picture
Next Stories
1 जगातील प्रभावशाली महिलांच्या यादीत १०५ वर्षीय भारतीय महिलेचा समावेश
2 ..म्हणून पॅरिसमध्ये सार्वजनिक वाहतूक केली मोफत
3 Viral Video : येथे कात्रीने नाही तर कु-हाडीने केस कापले जातात
Just Now!
X