News Flash

मुंबईचा ‘वडापाव’ सगळ्यात बेस्ट! जगप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफनंही केलं भरभरून कौतुक

ती मुंबईत आली होती

मुंबईचा ‘वडापाव’ सगळ्यात बेस्ट! जगप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफनंही केलं भरभरून कौतुक
मायदेशी परतल्यानंतर तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडापावचा फोटो शेअर करून या पदार्थांचं भरभरून कौतुक केलं आहे.

मुंबई आणि वडापाव हे समीकरण अफलातूनच आहे. वडापाव हे फक्त मुंबईचं स्ट्रीट फूड नक्कीच नाही, येथे दिवस-रात्र घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला परवडणारा आणि पोट भरणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे मुंबईकरांना वडापावविषयी विशेष अभिमान. पण, मुंबईकरांच्या सर्वात आवडत्या असलेल्या या पदार्थाचं चक्क जगप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ, फूड रायटर निजेला लाँसननं भरभरून कौतुक केलं आहे.

निजेला ही वृत्तवाहिनीवरची प्रसिद्ध निवेदिका, पत्रकारदेखील आहे. काहीदिवसांपूर्वी ती मुंबईत आली होती. मायदेशी परतल्यानंतर तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडापावचा फोटो शेअर करून या पदार्थांचं भरभरून कौतुक केलं आहे. २०१७ मध्ये मी खाल्लेला सर्वोत्तम आणि चविष्ट पदार्थ कोणता असेल तर तो आहे मुंबईचा वडापाव अशा शब्दात तिनं वडापावची स्तुती केली आहे. इतकंच नाही तर साबुदाणा, पोहे यांचंही तिनं भरभरून कौतुक केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2017 5:59 pm

Web Title: culinary queen nigella lawson expresses love mumbai ka vadapav
Next Stories
1 VIDEO : जळून खाक झालेलं ‘मोजोस ब्रिस्ट्रो’ पूर्वी असं दिसायचं
2 १ जानेवारीला जन्मलेल्या मुलीला मिळणार ५ लाख
3 जगातल्या सर्वात सुखी प्राण्यासोबत रमला टेनिसचा बादशाहा फेडरर
Just Now!
X