दोन महिन्यापूर्वी ऑस्ट्रेलियामधील एका महिलेला मॅकडोनल्डच्या बर्गरमध्ये अळ्या सापडल्या होत्या. त्याआधी अमेरिकेतील लुईझियाना शहरात राहणाऱ्या मॅकडोनल्डच्या माजी कर्मचाऱ्यानं देखील मॅकडोनल्डच्या आईस्क्रीम मशिनचे फोटो शेअर करून इथल्या अस्वच्छतेची पोलखोल केली होती, ही सारी प्रकरणं ताजी असतानाच बँकॉकमधल्या एका ग्राहकानं इथला आणखी एक प्रकार उजेडात आणला आहे.

पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून ‘या’ गावांत फटाके फोडतच नाही!

या ग्राहकाला मॅकडोनल्डच्या कॉफीमध्ये झुरळाचे पाय सापडले. त्याने याचा फोटो शेअर केला असून तो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या ग्राहकाची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मॅकडोनल्डने जाहीर माफी मागितली आहे. ‘न्यूज एशिया’च्या माहितीनुसार ग्राहकाच्या तक्रारीनंतर त्यावर कारवाई न करता त्याला फक्त नवीन कॉफी देण्यात आली होती. झुरळाचे पाय हे मॅकच्या कॉफीमशीनमध्ये नसून ते कपमध्ये असावेत असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. जेव्हा मॅकडोनल्डच्या कर्मचाऱ्यांचं उत्तर या ग्राहकाने ऐकलं तेव्हा त्याला आणखीनच धक्का बसला. कर्मचारी कप स्वच्छ आहेत की नाही तेही न पाहता ग्राहकांना कॉफी सर्व्ह करत असतील तर ते याहूनही भयंकर असल्याची प्रतिक्रीया या ग्राहकाने दिली आहे. दरम्यान त्याने लिहिलेली फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मात्र मॅकडोनल्डने परिपत्रक काढून माफी मागितली आहे.

happy diwali 2017 : नववधुसारखे नटले ‘गुलाबी शहर’ !

दोन महिन्यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एमी मॅकहग या महिलेलाही मॅकडॉनल्डाच्या बाबतीच वाईट अनुभव आला होता. एमीने तिच्या मुलासाठी मॅकडोनल्डमधून हॅप्पी मिल मागवलं होतं. यात बर्गरही होता. तिच्या मुलानं बर्गर थोडा खाल्ला. जेव्हा तिचं आपल्या मुलाच्या हातातल्या बर्गरकडे लक्ष गेलं तेव्हा तिला धक्का बसला कारण यात शेकडो अळ्या होत्या. अशी एक न दोन गेल्या काही महिन्यांपासून अनेक उदाहरणं समोर आल्यानं मॅकडोनाल्डची चांगलीच बदनामी झाली आहे.