23 January 2019

News Flash

VIRAL VIDEO : पैशांसाठी नाही तर खरेदीसाठी लावली भलीमोठी रांग

सवलतीचा लाभ घेण्यासाठी लोक तासन् तास राहिले रांगेत

ब्रँड फॅक्टरीने कपड्यांच्या खरेदीवर मोठी सूट जाहिर केली होती.

‘सूट, सूट, सूट’ कुठे ‘५०% टक्के सूट’ तर कुठे ‘७५% टक्के सूट’ असे मोठे मोठे जाहिरात फलक दिसले की आपली स्वारी त्या दुकानांत वळते. सूट जाहिर झाली की फक्त महिला वर्गालाच खरेदीचा मोह अनावर होतो असे नाही तर पुरुषमंडळी देखील सवलतीत खरेदी करण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हायरल झालेले काही फोटो आणि व्हिडिओ होय. ‘ब्रँड फॅक्टरी’ने आपल्या उत्पादनावर गेल्या आठवड्यात घसघसीत सूट जाहिर केली अन् लोकांची या दुकानांनबाहेर गर्दी जमली. या दुकानांबाहेर ग्राहकांनी इतकी गर्दी केली की काही ठिकाणी तर दुकानांबाहेर एक किलोमीटर रांग लागली होती. मुंबई, हैदराबाद अशा ठिकाणी ब्रँड फॅक्टरीच्या दुकांनाबाहेर रविवारी हेच चित्र पाहायला मिळाले.

वाचा : ‘फी नको पण झाडे लावा’, शाळेचा अनोखा उपक्रम

ब्रँड फॅक्टरीने कपड्यांच्या खरेदीवर मोठी सूट जाहिर केली होती. ‘पाच हजारांची खरेदी करा आणि फक्त २ हजार रूपयेच द्या. वरून १ हजारांचा शर्ट  आणि १ हजार रुपयांचे व्हाऊचरही मोफत’ अशी ही सवलत होती. आता अशी सवलत क्वचितच कुठे पाहायला मिळते. १६ ते १८ डिसेंबर असे तीन दिवस ही सवलत सुरू होती. आणि मग काय या सवलतीचा लाभ घेण्यासाठी लोकांनी चक्क ब्रँड फॅक्टरीच्या आउटलेट्स बाहेर गर्दी करायला सुरूवात केली. इतकी की काही आउटलेट्सच्या बाहेर चक्क एक किलोमीटर रांग होती. तर काही ठिकाणी लोक खरेदीसाठी तासन् तास रांगेत उभे होते. रविवारी तर ही गर्दी आणखी वाढली होती. लोक उन्हात उभे होते. त्यामुळे याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. नोटाबंदीनंतर सगळीकडेच खरेदी मंदावली असल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या होत्या. दोन हजारांचे सुटे कोणी देत नव्हते त्यामुळे अनेक ठिकाणी खरेदीवर याचा परिणाम पाहायला मिळाला. पण नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच ब्रँड फॅक्टरीला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसला.

‘खरेदीसाठी आलेल्यांकडे २ हजारांच्या नव्या नोटा होत्या. आतापर्यंत अशी सवलत कोणीच दिली नव्हती म्हणूनच ब्रँड फॅक्टरीच्या सवलतीला मोठा प्रतिसाद लाभलेला दिसत आहे’ असेही या कंपनीचे सिइओ किशोर बियाणी यांनी सांगितले. गेल्या महिन्याभरात नोटाबंदाच्या निर्णयानंतर एका दुकानाबाहेर मोठी रांग पाहायला मिळाल्याचे हे दुसरे उदाहरण आहे. अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांचे निधन झाल्यानंतर तामिळनाडूतल्या दारूच्या दुकानाबाहेर इतकी मोठी रांग पाहायला मिळाली होती.

VIDEO : जेव्हा जंगलाची राणी गावात येते

First Published on December 19, 2016 1:02 pm

Web Title: customer has been waiting outside brand factory store to enjoy a grand sale