24 November 2020

News Flash

Amazon Sale: अन् ग्राहकांनी 6,500 रुपयात खरेदी केली तब्बल 9 लाखांची कॅमेरा लेन्स

आता तुम्ही विचार करत असाल की या सेलबाबत माहिती तर तुम्हालाही होती, तरीही तुमचं लक्ष या 99 टक्के सवलतीच्या ऑफरकडे का नाही गेलं?

ऑनलाइन शॉपिंग करणारे वर्षातून एकदा येणाऱ्या Amazon Prime Day Sale सेलची आवर्जून वाट पाहत असतात. जगभरात यंदा हा सेल 15 आणि 16 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. या सेलमध्ये ग्राहकांना कधी नव्हे इतके म्हणजे तब्बल 99 टक्के सवलत मिळाल्याचं समोर आलं आहे.

आता तुम्ही विचार करत असाल की या सेलबाबत माहिती तर तुम्हालाही होती, तरीही तुमचं लक्ष या 99 टक्के सवलतीच्या ऑफरकडे का नाही गेलं? यामुळे हैराण व्हायची गरज नाही. कारण संकेतस्थळावरील एका ‘बग’ किंवा ‘ग्लिच’मुळे ग्राहकांना 99 टक्के सवलतीचा लाभ घेता आल्याचं समोर आलं आहे. पण ज्या ग्राहकांनी याचा लाभ घेतला त्यांच्यासाठी ही ऑफर एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हती.

काही युजर्सना या सेलमध्ये 9 लाख रुपयांची कॅमेरा लेन्स अवघ्या 6 हजार 500 रुपयांमध्ये खरेदी करता आली. काहीच वेळात हे वृत्त व्हायरल झालं आणि संकेतस्थळावर कॅमेरा लेन्स खरेदी करण्याची रेस लागली. इतक्या भरमसाठ सवलतीसह मिळाणाऱ्या लेन्सच्या यादीत सोनी, कॅनन आणि फूजीफिल्म यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या लेन्सचा समावेश होता. ही तांत्रिक समस्या थोड्याचवेळासाठी होती, पण तेवढ्या वेळात काहींनी या संधीचा फायदा उचलत 9 लाख रुपयांची (13 हजार युएस डॉलर) Canon EF 800 lens अवघ्या 6 हजार 500 रुपयांमध्ये (95 युएस डॉलर ) खरेदी केली.

यानंतर सोशल नेटवर्क ‘रेडिट’वरती अनेकांनी लाखो रुपयांची कॅमेरा लेन्स इतक्या स्वस्तात खरेदी केल्याचा आपला आनंद साजरा केला. काहींनी तर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांचेही आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 9:50 am

Web Title: customers accidentally got 99 percent discount on amazon prime day due to glitch sas 89
Next Stories
1 Video : जेव्हा अमेरिकेची टेनिसपटू स्वतःच्या लग्नात बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकते
2 ‘चांद्रयान २’च्या यशस्वी उड्डाणानंतर या कारणामुळे ‘नासा’ही ट्रोल, पाहा व्हायरल मिम्स
3 ‘त्यांच्या झेंड्यावर चंद्र, आपला चंद्रावर झेंडा’, चांद्रयान अवकाशात झेपावले नेटकऱ्यांनी पाकिस्तानला झापले
Just Now!
X