10 August 2020

News Flash

वेफर्सच्या डब्यातून दुर्मिळ सापांची तस्करी

तस्करीचे रॅकेट उघड

तीन किंग कोब्रांना वेफर्सच्या डब्यामध्ये भरून नेण्यात येत होतं

अंमली पदार्थ असोत की सोनं, दागिने, हिरे… ते हव्या त्या ठिकाणी नेण्यासाठी तस्कर वाट्टेल ते करतात. अनेकदा ते पकडले जातात आणि तेव्हा या तस्करीचे अनेक फंडे समोर येतात. नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका तस्कराने दुर्मिळ सापांची तस्करी करण्यासाठी एक अजब फंडा निवडला. वेफर्सच्या डब्यामध्ये या दुर्मिळ सापांना भरून तो नेत होता. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला आणि त्याने हे तस्करीचे रॅकेट उघड केलं. अतिशय दुर्मिळ अशा तीन किंग कोब्रा सापांना वेफर्सच्या डब्यामध्ये भरून नेण्यात येत होतं. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधला हा प्रकार आहे. दुर्मिळ साप असल्याने काळ्या बाजारात त्याला मोठी मागणी होती. यातून मोठ्या प्रमाणात पैसाही तस्करांना मिळतो, पण दुर्मिळ सापांची खरेदी विक्री करण्यात कायद्याने बंदी असल्याने तस्कर अशा भन्नाट शक्कल लढवतात.

काही दिवसांपूर्वी हाँगकाँगमध्ये एका महिला तस्करला पोलिसांनी अटक केली होती. या महिलेनं एकावेळी चक्क १०२ आयफोनची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. तिनं हे सगळे आयफोन पोटाला बांधले होते. हे फोन लपवण्यासाठी तिनं उबदार लोकरीचे कपडे परिधान केले होते. तिची एकंदर शरीरयष्टी पाहता तिचं पोट मोठं आणि हात पाय बारीक दिसत होते तेव्हा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिला लगेच हेरलं आणि तिची रवानगी तुरूंगात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2017 12:00 pm

Web Title: customs agents caught a package containing three live king cobras inside potato chip cans
टॅग Smuggling
Next Stories
1 Viral : घरात कित्येक महिन्यांपासून राहत होता पाहुणा, अन् तिला माहितही नव्हते
2 Viral Video : सुंदर तरुणीकडे रोखून बघणं त्याला पडलं महागात
3 Viral Video : मेलेलं पिल्लू कवटाळून ती आई कित्येक दिवस रडत होती
Just Now!
X