News Flash

Viral Video : गजराजांच्या क्रीडाप्रेमामुळे रस्त्यावर अर्धातास ट्रॅफिक जाम!

कधी हत्तीला फुटबॉल खेळताना पाहिलंत का?

Viral Video : गजराजांच्या क्रीडाप्रेमामुळे रस्त्यावर अर्धातास ट्रॅफिक जाम!
(छाया सौजन्य : कार्टर्स क्लिप)

कधी हत्तीला फुटबॉल खेळताना पाहिलंत का? मग सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहाच. या हत्तीला खेळण्याचा मोह इतका अनावर झाला की गजराज चक्क जंगलातून खेळण्यासाठी रस्त्यावर उतरले. रस्त्याच्या कडेला असलेली वस्तू त्याने उचलली आणि तिच्यासोबत खेळण्याचा मदमुराद आनंद त्याने लुटला. पण गजराजांच्या क्रीडाप्रेमामुळे वाहतुकीची मात्र मोठी कोंडी झाली.

आसाममधला हा व्हिडिओ आहे. हत्तीच्या पिल्लाला खेळण्याची इतकी लहर आली की भर रस्त्यातच त्याने खेळायला सुरूवात केली. पण हत्तीच्या या क्रीडाप्रेमामुळे रस्त्यात मात्र वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. पुढचे अर्धा तास ही कोंडी सुटलीच नव्हती. हे पिल्लू काही रस्त्यावरून हटणार नाही हे लक्षात येताच अनेकांनी आपला मार्ग बदलला. पण काहींनी मात्र गाडीतून उतरून या दुर्मिळ दृश्याचा मनमुराद आनंद लुटला. आतापर्यंत इथल्या लोकांनी हत्तीचं आक्रमक रूप पाहिलंय. एरव्ही हे हत्ती शेतात घुसून पिकांची नासधूस करतानाही त्यांनी जवळून बघितलय. पण गजराजांचे हे रुप मात्र अनेकांना नवे होते. तेव्हा त्याचे हे गोंडस रुप कॅमेरात कैद झाले नसते तर नवल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2017 4:52 pm

Web Title: cute elephant cub coming out of forest to enjoy a football game
Next Stories
1 Manchester blast : ‘मँचेस्टरची देवदूत’, तिच्यामुळे अनेक मुली सुरक्षित
2 Viral Video : याच ठिकाणी झकरबर्गने केली होती ‘फेसबुक’ची निर्मिती
3 ४८ तास सहजीवनाचे!
Just Now!
X