हिवाळ्यामध्ये सायकल प्रेमींसमोर असणारं सर्वात मोठं आव्हान म्हणजे बर्फ आणि गोठलेली तलावं. जगातील अनेक ठिकाणी शून्याच्या खाली पारा गेल्यानंतर सायकल चालवणं हे सायकल प्रेमींसाठी मोठं टास्क असतं. अनेकदा या काळामध्ये सायकल प्रेमी इतर गोष्टींमध्ये मन रमवतात. मात्र द क्यू नावाच्या एका प्रोडक्ट इंजिनियरने बर्फात सायकल चालवण्यासाठी एकदम भन्नाट पण तितकीच खतरनाक कल्पना शोधलीय. या पठ्याने बर्फात सायकल चालवता यावी म्हणून चक्क सायकलच्या चाकांच्या जागी गोलाकार ब्लेड लावलेत. एखाद्या सायफाय चित्रपटामध्ये दाखवतात त्याप्रमाणे ही सायकल दिसत असून तिला या इंजिनियरने आइससायकल असं नाव दिलंआहे.
या तरुणाने आपल्या सायकलची चाकं काढून त्याजागी स्टीलच्या मोठ्या डिस्क लावल्या आहेत. या डिस्कच्या कड्या त्रिकोणी कापून त्यांना ब्लेडसारखा आकार देत पॉलिश केलं आहे. या डिस्क केवळ ब्लेडसारख्या दिसत नाही तर त्यांना धार करण्यात आल्याने त्या एखाद्या कटरच्या ब्लेडप्रमाणेच काम करतात. पहिल्यांदा तो या डिस्क लावून गोठलेल्या तलावावर सायकल चालावायला गेला तेव्हा ब्लेडने बर्फाचा पृष्ठभाग कापून निघाला आणि सायकल चावणं त्याला जमलं नाही. त्यानंतर त्याने तंत्रज्ञानाचा वापर करुन या ब्लेडच्या बाहेरील बाजूस धातूनची आणखीन एक पट्टी लवली आणि यावेळी त्याला यश आलं. या सायकलाचा व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. ही सायकल अनेकांना आवडली असून या व्हिडीओवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया पहायाला मिळत आहेत.
अशाप्रकारे प्रयोग करण्याची द क्यूची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी २०१९ मध्ये त्याने सायकच्या चाकांऐवजी चाकांचे बुट लावून एक भन्नाट सायकल तयार केली होती. मात्र ती चालवताना अनेक अडथळे आले. त्यामुळेच त्याने हा नाद सोडून दिला आणि काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेत ही आइससायकल साकारली. ११ फेब्रुवारीला पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओला आठ दिवसांमध्ये दोन कोटींहन अधिक व्ह्यूज मिळाले असून व्हिडीओला एक लाख ९४ हजारहून अधिक लाईक्स मिळालेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2021 3:10 pm