अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. बुधवार सकाळपर्यंत त्याचे रूपांतर तीव्र स्वरुपाच्या चक्रीवादळ होणार असून निर्सग नावाचे हे चक्रीवादळ दुपारी दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच किनारपट्टीला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, जालना, सातारा या जिल्ह्य़ांत बुधवारी मुसळधार पावसाची, तर सांगली सोलापूर आणि संपूर्ण मराठवाडय़ात हलका ते मध्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती दिली. निर्सग चक्रीवादळाची सोशल नेटवर्किंगवरही चांगलीच चर्चा आहे.

मुंबईला जून महिन्यामध्येच वादळाचा तडाखा बसण्याची ही पहिलीच वेळ असल्याने एकीकडे या वादसंदर्भात भीती असली तरी दुसरीकडे सोशल नेटवर्किंगवर निसर्ग चक्रीवादळासंदर्भातील मिम्सही व्हायरल झाले आहेत. पाहुयात असेच काही व्हायरल झालेले मिम्स…

मुंबईत पहिल्यांदाच…

पहिल्यांदाच…

२०२० आपल्याला असं वागवतयं…

संकटांमागून संकटं

मी निसर्गला फोन करुन विचारताना…

काहीही झालं तरी मोबाइल नाही सोडणार

संकटं पाठलाग सोडेनात

तुम्हाला मस्करी वाटतेय?

मारा मला मारा…

हे तर काहीच नाही…

सगळं थोडं थोडं टाका

अरे घाबरत नाही आम्ही….

बुधवारी निसर्ग चक्रीवादळामुळे ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ांना काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्य़ात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.