तासन् तास कंम्प्युटवर व्हिडिओ गेम्स खेळत बसल्यावर कोणी श्रीमंत झाल्याचं ऐकलंय का? खरं तर व्हिडिओ गेम्स हे मुलांसाठी चांगले नसल्याचं आपण नेहमी ऐकत आलोय. सतत व्हिडिओ गेम्स खेळल्यानं मुलांवर त्याचा मानसिक आणि शारिरीक परिणाम होतो असं आपण पाहत आलोय. पण २६ वर्षांच्या डॅन मिडल्टननं व्हिडिओ गेम्स खेळण्याचा आपला छंद जपला आणि याच छंदाचा त्यानं पैसे कमाविण्यासाठीदेखील वापर केला. म्हणूनच २०१७ मधल्या सर्वाधिक श्रीमंत यूट्युबरच्या यादीत डॅन सर्वात वरच्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे.

जाणून घ्या २०१७मध्ये भारतीयांनी गुगलवर काय शोधले?

‘फोर्ब्स’च्या माहितीनुसार डॅनचं वार्षिक उत्पन्न हे ८० ते ९० कोटींच्या आसपास आहे. डॅनचा ‘DanTDM’ हा यूट्युब चॅनेल आहे. व्हिडिओ गेम्सचे रिव्ह्यू तो देतो. त्याच्या गेम्स रिव्ह्यूंना तरुणांची चांगलीच पसंती लाभली आहे. त्याच्या अनेक व्हिडिओंना दीड कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. अनेक यूट्युबरचे व्ह्यूज हे लाखोंच्या घरात असतात पण डॅनच्या बाबतीत मात्र व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात असते. फोर्ब्स मासिकानं २०१७ च्या श्रीमंत यूट्युबरच्या यादीत त्याला स्थान दिले आहे.

डॅननंतर सर्वात श्रीमंत यूट्युबरच्या यादीत सहा वर्षांचा रायन आहे. त्याची वर्षिक कमाई ही ७० कोटींच्या घरात आहे. रायन हा जगातील सर्वात लहान श्रीमंत यूट्युबर आहे.

Video: मुकेश अंबानींच्या मुलाच्या व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेचे सत्य