News Flash

…अन् तो थेट हॉटेलच्या गच्चीवरुन जलतरण तलावात झेपावला

जीवघेण्या स्टंटचा व्हिडीओ जगभरात व्हायरल

थरारक स्टंटचा व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी एका इमारतीवरुन थेट जलतरण तलावात उडी मारणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला. आता याच व्यक्तीने आधीपेक्षा अधिक उंचीवरुन जलतरण तलावात उडी मारली आहे. 8booth या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या या तरुणाने एका हॉटेलच्या गच्चीवरुन थेट जलतरण तलावात उडी मारली आहे. यावेळीही या व्यक्तीने त्याचा हा कारनामा कॅमेऱ्यात कैद केला आहे. मात्र यंदा हा सर्व कारनामा दोन कॅमेऱ्यांमध्ये कैद करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ कॅलिफोर्नियातील लगुना बीचवरील एका हॉटेलमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. हॉटेलवरुन जलतरण तलावात झेपावणाऱ्या या व्यक्तीने स्वत:च्या डोक्यावर एक कॅमेरा लावला असल्याने हा स्टंट किती अवघड आहे, याची कल्पना येते. व्हिडीओच्या सुरुवातीला ही व्यक्ती हॉटेलमध्ये इकडून तिकडे पळताना दिसते. मागील बाजूने हॉटेलमध्ये शिरलेली ही व्यक्ती हॉटेलच्या शिड्यांनी थेट छतावर पोहोचते. ही व्यक्ती छतावरुन खाली पाहता असताना हा स्टंट जीवघेणा असल्याची खात्री पटते. त्यानंतर पुढच्याच सेकंदाला ही व्यक्ती थेट जलतरण तलावाच्या दिशेने झेपावते आणि अवघ्या काही सेकंदांमध्ये पाण्यात पाहायला मिळते. हे सर्व करत असताना थोडीशी जरी चूक झाली असती, तरी या व्यक्तीचा जीव गेला असता.

यावेळी या व्यक्तीने स्टंट करताना हॉटेलच्या समोर असणाऱ्या छतावरदेखील एक कॅमेरा लावला होता. या कॅमेऱ्यात हा संपूर्ण स्टंट कैद झाला आहे. दोनच आठवड्यांपूर्वी याच व्यक्तीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी या व्यक्तीने इमारतीच्या पाचव्या किंवा सहाव्या मजल्यावरुन उडी मारल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हा व्हिडीओ त्यावेळी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 7:34 pm

Web Title: daredevil pool jumper again jump in swiming pool from hotel roof
Next Stories
1 ‘त्या’ फोटोंमुळे राज ठाकरे ट्विटरवर अडचणीत
2 …जेव्हा बराक ओबामा कोणासाठी तरी विमानाबाहेर ताटकळतात
3 मैदानात ‘फ्लॉप’ ठरलेला शिखर धवन मैदानाबाहेर सर्वाधिक ‘हिट’
Just Now!
X