यंदाचा ‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऑफ द इअर’ हा मानाचा पुरस्कार लंडनमधल्या डेव्हिड लॉएडनं पटकावला आहे. ‘बाँड ऑफ ब्रदर्स’ नावाच्या त्यांच्या फोटोला लोकांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. दोन सिंहामधलं नातं दाखवणारा हा फोटो यंदाचा लोकप्रिय फोटो ठरला आहे.

‘भावना फक्त माणसांना व्यक्त करता येतात असं नाही प्राण्यांनाही भावना असतात आणि ते देखील व्यक्त करतात असाच एक अप्रतिम क्षण मी माझ्या कॅमेरात कैद केला. या फोटोला वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऑफ द इअर च्या किताबानं नावाजलं गेलं याचा मला खूपच आनंद होत आहे अशा शब्दात डेव्हिड यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

जगभरातल्या हजारोफोटोंमधून सर्वोत्तम २५ फोटोंची निवड करण्यात आली होती. यातल्या डेव्हिडच्या फोटोनं बाजी मारत फोटोग्राफर ऑफ द इअरचा किताब पटकावला तर अन्य ४ फोटोंची निवड लोकप्रिय फोटो विभागात झाली आहे. २०१८ साली या स्पर्धेत ९५ देशांतील ४५ हजार फोटोग्राफर्सनं आपले फोटो पाठवले होते.