News Flash

Video : बालाssss ! डेव्हिड वॉर्नरचा अक्षय कुमार स्टाईल डान्स पाहिलात का??

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात सर्व खेळाडू या काळात आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर गेल्या काही दिवसांमध्ये टिकटॉकवर भारतीय सिनेमांमधली गाणी, डायलॉगवर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याच्या हाऊसफूल ४ सिनेमातील बाला या गाण्यावर वॉर्नरने डान्स करत व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे अक्षय कुमारने वॉर्नरच्या व्हिडीओवर आपली प्रतिक्रीया देत, तुला जमलंय…असं म्हटलंय. वॉर्नरने काही दिवसांपूर्वी बाहुबली सिनेमातला संवादावर एक व्हिडीओ बनवत टिकटॉकवर अपलोड केला आहे. याआधीही वॉर्नरने तेलगू सिनेमातील गाण्यावर डान्सचा व्हिडीओ अपलोड केला होता. वॉर्नच्या या प्रयत्नांना सोशल मीडियावर नेटकरी चांगलाच प्रतिसाद देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 8:22 pm

Web Title: david warner dances on akshay kumar bala dance from housefull 4 psd 91
Next Stories
1 सलाम! वृद्ध भिक्षेकरी महिलेने गरजूंना दान केले १ क्विंटल तांदूळ आणि रोख पैसे
2 एका लग्नाची अनोखी गोष्ट… लॉकडाउनच्या काळात सीमेवरच पार पडला निकाह
3 जबरदस्त! सहा वर्षाच्या चिमुरड्याने उलगडला आठ वर्षांपूर्वी घडलेला गुन्हा, पोलिसही चक्रावले
Just Now!
X