News Flash

मजा येत नाही ! तीन Porn Sites विरोधात कर्णबधिर व्यक्तीचा खटला, भेदभाव केल्याचा आरोप

नुकसानभरपाई देण्याचीही केली मागणी

(सांकेतिक छायाचित्र)

कोणा व्यक्तीने एखाद्या पॉर्न वेबसाइट्सविरुद्ध भेदभाव केल्याचा आरोप करत खटला दाखल केल्याचं तुम्ही ऐकलंय का…? हो असं घडलंय. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका कर्णबधिर व्यक्तीने तीन पॉर्न वेबसाइट्सविरुद्ध चक्क भेदभाव केल्याचा आरोप करत खटला दाखल केला आहे. तसेच, नुकसानभरपाई देण्याचीही मागणी केली आहे. Pornhub, Redtube आणि YouPorn तसेच या वेबसाइट्सची कॅनडातील पॅरंट कंपनी MindGeek यांच्याविरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे.

ब्रुकलीन फेडरल कोर्टात गुरूवारी यारोस्लाव सुरीज नावाच्या व्यक्तीने हा खटला दाखल केलाय. वेबसाईटवरील व्हिडिओमध्ये सबटायटल देण्यात आलेले नाहीत त्यामुळे व्हिडिओंची पूर्णपणे मजा घेता येत नाही, अशी तक्रार सुरीजने केली आहे. या वेबसाइट्स अमेरिकेच्या दिव्यांगांसदर्भातील कायद्याचे( ‘अमेरिकन्स विद डिसेबॅलिटी अॅक्ट’ ) उल्लंघन करत असल्याचेही तक्रारकर्त्याने म्हटले आहे.

“ऑक्टोबर आणि या महिन्यात काही व्हिडिओ पाहण्याचे ठरवले होते, पण पाहू शकलो नाही. सबटायटलशिवाय कर्णबधिर किंवा ज्यांना कमी ऐकायला येते अशा लोकांना व्हिडिओची पूर्ण मजा घेता येत नाही. तर, सर्वसामान्य लोकांना सबटायटल्सचा काही विशेष फरक पडत नाही” असे सुरिजने आपल्या २३ पानांच्या अर्जात नमूद केले आहे. सर्व वेबसाइट्सनी सबटायटल द्यावे असे सुरीज यांनी म्हटले आहे. तर, आपल्या वेबसाइटवर सबटायटल असलेले एक सेक्शन असून त्या सेक्शनची लिंकही वेबसाइटवर देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण पॉर्नहब या वेबसाइटचे उपाध्यक्ष कोरी प्राइस यांनी दिले आहे. यापूर्वीही सुरीजने फॉक्स न्यूजविरोधात अशाच प्रकरणात खटला दाखल केलेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 11:54 am

Web Title: deaf man from new york brooklyn sues porn sites over lack of closed captioning sas 89
Next Stories
1 या मुस्लीम देशाच्या नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो!
2 कुत्र्यासोबत फोटोशूट महागात; तरुणीच्या चेहऱ्यावर पडले तब्बल ४० टाके
3 मजेदार ऑफर! पहिल्या पत्नीने हॉल बूक केल्यास तिसऱ्या लग्नासाठी ७५ टक्के सूट
Just Now!
X