17 July 2019

News Flash

Viral Video: दीप-वीरच्या लग्नात रणबीर गायला, ‘सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी’

दीपिका रणवीरच्या लग्नामधील माहेरची साडी व्हर्जन व्हायरल

'दीप-वीर माहेरची साडी स्पेशल'

दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर झालेल्या रिसेप्शन सोहळ्यांची चर्चा अद्यापही सुरुच आहे. तरी या दोघांनीही पुन्हा आपले रुटीन काम सुरु केले आहे. रणवीर काही दिवसांपूर्वी आपल्या आगामी ‘सिम्बा’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला उपस्थित होता. तर दीपिकाही तिच्या आगामी सिनेमांच्या तयारीला लागल्याचे वृत्त आहे. असे असले तरी या दोघांचे चाहते अद्याप या दीपवीर लग्न फिव्हरमधून बाहेर आल्याचे चित्र दिसत नाहीय. म्हणूनच की काय लग्नानंतर जवळजवळ एक महिन्यानंतरही दोघांचे लग्नातील फोटो, रिसेप्शनचे फोटो आणि मिम्स व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओचे नाव आहे ‘दीप-वीर माहेरची साडी स्पेशल’.

हो वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण खरोखरच अशा नावाने एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये दीपिकाचा आधीचा प्रियकर रणबीर सिंग हा दीपिकासाठी ‘सासरला ही बहिण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी’ हे गाणे गाताना दाखवण्यात आले आहे. सिनेमांमधील काही दृष्ये एडीट करुन तयार करण्यात आलेल्या या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर तासभरात दहा हजारच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्हीच पाहा हा व्हायरल होत असणारा व्हिडीओ…

आता या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलेय त्याप्रमाणे खरोखरच हे सर्व जुळवून आणणाऱ्या या एडिटरला सलामच केला पाहिजे. रणवीर आणि दिपिकाच्या लग्नाचे फोटो दोघांनीही ट्विटवरून पोस्ट केल्यानंतर लगेचच काही तासांमध्ये त्यावरील मिम्सही व्हायरल झाले होते.

First Published on December 5, 2018 3:47 pm

Web Title: deep veer wedding maherchi sadi version