स्त्रीमुक्ती संघटनांनी गेली कित्येक दशकं समाजाच्या सर्व स्तरांमध्ये केलेल्या कार्यामुळे अलीकडे स्त्रीहक्कांविषयी लक्षणीय प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. आपल्या समाजाची पुरूषी मानसिकता संपूर्णपणे बदलायला बराच काळ लागणार असला तरी एक सुरूवात निश्चितपणे झाली आहे. मजलिस, नारी अत्याचार विरोधी मंच, आवाज-ए-निस्वान यांसारख्या अनेक स्त्रीवादी संघटनांनी आपला संदेश सर्व सामाजिक थरांमध्ये पोचवत या विचारांच्या पार्श्वभूमीवर वाढलेली एक नवी पिढी तयार होईल अशी काळजी घेतली. त्याचाच परिणाम आज आपल्या सभोवताली होत स्त्रीहक्कांविषयी वर्षांपूर्वीपेक्षा निश्चितच जास्त प्रमाणात जागृती झाली आहे.

वाचा- पठ्ठ्याने समुद्राखाली केलं लग्न

बदलत्या समाजमनाच्या अनुषंगाने कायद्यांमध्येही पीडित स्त्रीला न्याय मिळेल असे बदल झाले अजून बराच मोठा पल्ला गाठायचाय.

याबरोबरच या कायद्यांचा दुरूपयोग करण्याचे प्रकारही वाढीस लागल्याचं आढळून आलंय. गावकुसातल्या, सर्व दृष्टीने असहाय्य महिलेच्या संरक्षणासाठी कायद्यात केलेल्या तरतुदींचा वापर करत अनेक महिलांनी पुरूषांना गोवल्याची उदाहरणं पुढे येत आहेत.

हे वाचत असताना समस्त पुरूषांना आनंदाच्या उकळ्या फुटायची आणि त्यांनी शहाजोगपणे ‘पहा आम्ही सांगत होतो’ वगैरे म्हणण्याची गरज नाही. या कायद्यांचा गैरवापर होतो म्हणून हे कायदेच रद्द करा अशी प्रतिक्रिया पार टोकाची आहे. पण हा गैरवापर रोखण्याचीही गरज आहे.

हाच तो बाळासाहेबांचा आवाज!; उद्धव ठाकरेंच्या खणखणीत भाषणानंतर ‘सोशल’ आवाजही बुलंद

मग पुरूषांच्या बाजूने कोण उभं राहणार? कारण सगळ्या स्त्रिया स्त्रीवादीच ना?

या सगळ्या समजाला छेद देत कायद्याच्या गैरवापरामुळे नाडल्या गेलेल्या पुरूषांच्या बाजूने उभी राहिली आहे.

महिलांचं हुंड्याच्या प्रथेपासून संरक्षण व्हावं म्हणून तयार करण्यात आलेल्या ४९८ (अ) कायद्याचा दुरूपयोग करत अनेक पुरूषांना नाडल्याचं समोर आलंय. दीपिका भारद्वाज ही पूर्वश्रमीची पत्रकार आहे. २०११ साली तिच्या एक भावाचा घटस्फोट झाला होता. तेव्हा सासरच्यांनी त्याच्याविरोधात खोटे दावे करत त्याच्या कुटुंबाकडून मोठी रक्कम उकळली होती. त्यानंतर दीपिकाने या विषयावर अभ्यास करणं सुरू केलं आणि या क्षेत्रात काम करायला सुूरूवात केली. तिने या विषयावर ‘मार्टर्स आॅफ मॅरेज’ ही एक डाॅक्युमेंट्री बनवली आहेत. या क्षेत्रात काम करत असताना ती स्त्रीविरोधी असल्याचा आरोपही तिच्यावर झाला. पण आपण स्त्री किंवा पुरूष या दोघांपैकी कोणाच्याही ‘बाजूने’ लढत नसल्याचं तिने स्पष्ट केलंय.

स्त्री असो वा पुरूष, दोघांनाही समान हक्काचा अधिकार आहे. पुरूषप्रधान समाजाने स्त्रियांवर अन्याय करू नयेत त्याचबरोबर आपल्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी तयार केलेल्या कायद्यांचा गैरवापर करत कुणा पुरूषाचं जीवनही कुठल्या स्त्रीने संपवू नये.

दीपिका भारद्वाजसारख्या महिला हाच समतोल साधायला प्रयत्न करत आहेत.