चीनमधील शेनझेन प्रांतात आयोजित करण्यात आलेल्या हाफ-मॅरेथॉ़न स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडूंची लबाडी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. तब्बल 258 धावपटू विविध प्रकारे लबाडी करताना पकडले गेले आहेत. सरकारी वृत्तवाहिनी Xinhua ने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व धावपटूंवर आता आजन्म बंदी घालण्यात आलेली आहे. 258 पैकी 18 खेळाडू हे बनावट क्रमांक लावून धावत होते, तर 3 खेळाडू हे खोट्या नावांवर धावताना आढळले. यातल्या काही जणांनी आपल्या स्पर्धेचा मार्ग बदलत शॉर्टकटही मारण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्पर्धेच्या आयोजकांनी घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. अशा प्रयत्नांमुळे सर्व आयोजनला बट्टा लागतो. त्यामुळे भविष्यकाळात स्पर्धकांनी प्रामाणिकपणे खेळून असे चुकीचे मार्ग अवलंबू नयेत. शेनझेन मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या खेळाडूंवर ट्रॅफिक कॅमेरे व सर्व अत्याधुनिक यंत्रणाद्वारे नजर ठेवण्यात आली होती. या घटनेची सध्या सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.