News Flash

जिंकलंस ! ‘या’ कारणामुळे रिक्षाचालकावर कौतुकाचा वर्षाव

मूळ कोलकात्याच्या नेहा दास हिने आपल्या फेसबुक पेजवर ही घटना सांगितली आहे

(रिक्षाचालक प्रवीण रंजन)

रात्रीचा प्रवास तेही तरुण मुलींसाठी म्हणजे एकदम टेंशनचं काम…आणि त्यातही जर दिल्लीत रात्रीचा प्रवास करायचा असेल तर मग विचारायचीच सोय नाही, कारण येथे रात्रीच्या वेळी एकट्या मुलीने घराबाहेर पडणं म्हणजे ‘खतरों से खेलना’ असंच असतं. पण महिलांसाठी असुरक्षित अशी ओळख असलेल्या याच दिल्लीमध्ये एका रिक्षाचालकाने आपल्या कृत्याद्वारे सर्वांचंच मन जिंकलं आहे. प्रवीण रंजन असं या रिक्षाचालकाचं नाव. सोशल मीडियावर तर प्रवीण यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

दिल्लीमध्ये सध्या थंडीचा जोर वाढायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे रात्र झाली की रस्ते सामसूम व्हायला सुरूवात होते. अशातच एक तरुणी रात्री उशीरा आपल्या ऑफिसमधून घरी परतत होती, आणि त्यासाठी रिक्षाची वाट पाहत होती. थोड्यावेळाने अचानक एक रिक्षाचालक तिच्याजवळ येवून थांबला. मूळ कोलकात्याच्या नेहा दास हिने आपल्या फेसबुक पेजवर ही घटना सांगितली आहे.

‘मी रिक्षाची वाट पाहत असताना एक सभ्य रिक्षाचालक माझ्याजवळ येवून थांबला. मी त्याला किती भाडं होणार विचारलं असता, मॅडम मी इतक्या रात्रीच्या वेळी महिलांकडून पैसे घेत नाही. कारण त्यांना सुखरूप घरी पोहोचवणं जास्त गरजेचं आहे असं तो म्हणाला. थोड्यावेळाने मी घरी पोहोचल्यावर त्यांना भाड्याचे पैसे देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नकार दिला. मी भाड्याव्यतिरिक्त अधिकचे पैसे देण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर अनेकदा विनंती करुनही त्यांनी जादा पैसे घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि रात्रीचं भाडं आकारण्यासही नकार दिला. मी वारंवार त्यांना पैसे घेण्याची विनंती करत होते, त्यामुळे त्यांनी अखेर केवळ भाड्याचे योग्य तेच पैसे घेतले. त्यानंतर रिक्षातून उतरताना मी त्यांचा फोटा काढण्याची परवानगी मागितली तर त्यावर त्यांनी स्मित हास्य करत मला फोटो काढू दिला. नेहाने आपल्या पोस्टमध्ये प्रवीण रंजन यांचे आभार मानले आणि अशाप्रकारच्या चांगल्या कामासाठी आणि सभ्य लोकांसाठी देवाचेही आभार मानले. नेहाची ही फेसबुक पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली, आणि युजर्सकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव व्हायला सुरूवात झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2018 2:35 pm

Web Title: delhi auto driver wins hearts online who refuses to charge money from woman travelling alone at night
Next Stories
1 अभिमानास्पद ! नक्षलग्रस्त भागातील मुलगी एका दिवसासाठी झाली ऑस्ट्रेलियाची राजदूत
2 आपलं दिवाळीचं अभ्यंगस्नान सुगंधी करणाऱ्या आदिवासी महिला
3 अरे बापरे! अंत्यविधीनंतर चक्क १५ दिवसांनी परतला घरी
Just Now!
X