News Flash

प्रवाशांना थंडी वाजू नये यासाठी रिक्षाचालकाने लढवली भन्नाट शक्कल

हा जुगाड पाहून तुम्ही थक्क व्हाल

रिक्षा चालक

एकीकडे जगभरामध्ये नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असतानाच दुसरीकडे भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विक्रमी थंडी पडली आहे. दिल्लीच्या तापमानात सध्या मोठ्या प्रमाणावर घट झाली असून शनिवारी पहाटे रेकॉर्डब्रेक २.४ डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सोशल नेटवर्किंगवरही दिल्लीच्या थंडीचीच चर्चा आहे.

मात्र इतक्या थंडीमध्येही दिल्लीतील शाळा, कॉलेजेस आणि कार्यलये सुरु असल्याने कुडकुडतच अनेकजण पहाटे घराबाहेर पडतात. उन्हाळ्याप्रमाणेच प्रचंड थंडीमध्येही प्रवास करणे कठीण असते. त्यातच तुम्ही रिक्षाने वगैरे प्रवास करत असाल तर बोरची थंडी आणखीनच त्रासदायक वाटते. मात्र दिल्लीमधील एका रिक्षावाल्याने प्रवाशांना थंडीमधून जाताना गार वारा लागू नये म्हणून एकदम भन्नाट कल्पना लावली आहे. याच रिक्षाचा फोटो आता सोशल मिडियावर चर्चेत आला आहे. अर्थात हा व्हिडिओ रेकॉर्डब्रेक थंडीच्या आधीचा असला तरी तो आता थंडीचा प्रभाव वाढल्यानंतर पुन्हा व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये रिक्षावाल्याने चालकाच्या बाजूने थेट प्रवाशाच्या अंगावर येणारी हवा रोखण्यासाठी मध्यभागी बबल रॅपसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक लावले आहे. यामुळे रिक्षा वेगाने जात असली तरी बाहेरील गार वारा थेट प्रवाशांना लागणार नाही अशी यामागील संकल्पना आहे. एका ट्विटर युझरने ही जीफ इमेज ट्विट केला आहे.

अनेकांनी या रिक्षावाल्याचे कौतुक केलं आहे. अनेकांना ही कल्पना आवडली असून त्यांनी प्रवाशांची काळजी करणाऱ्या या रिक्षावाल्याला धन्यवाद म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीमधील थंडीचा प्रकोप नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कायम राहू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याआधी दिल्लीमध्ये डिसेंबर १९९७ मध्ये सलग १३ दिवस थंडीची लाट पसरली होती. डिसेंबरमध्ये एकूण १७ दिवस थंडीचा कहर जाणवला होता. यावेळी आजवर १४ दिवस थंडीचा प्रकोप कायम आहे. स्कायमेटच्या अनुमानानुसार, ३१ डिसेंबर, १ आणि २ जानेवारी रोजी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर भारतातील डोंगराळ भागांमध्ये ३ जानेवारीला बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2019 4:47 pm

Web Title: delhi autowalas jugaad to shield passengers from citys biting cold is winning the internet scsg 91
Next Stories
1 Video: फोटोसाठी कायपण; BMW बाईक चालवणाऱ्याला पोलिसांनी थांबवलं अन्…
2 Reliance JioFiber युजर्ससाठी गुड न्यूज, 199 रुपयांत तब्बल 1000GB डेटा
3 जाणून घ्या Reliance Jio चे बेस्ट प्रीपेड प्लॅन, दररोज 3GB पर्यंत डेटा
Just Now!
X