19 January 2021

News Flash

‘बाबा का ढाबा’ची होणार भरभराट, कारण झोमॅटोची मिळाली साथ

व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून मदत मिळू लागली

दिल्लीतील मालविया नगर परिसरात एक छोटासा ढाबा चालवणारे ८० वर्षीय कांता प्रसाद यांच्या मदतीला आज संपूर्ण देश पुढे सरसावला आहे. करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून काहीच कमाई होत नसल्याचं सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांना मदत मिळू लागली आहे. ‘बाबा का ढाबा’वर आता लोकांनी खच्चून गर्दी केली असून कांता प्रसाद यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम सोशल मीडियाच्या ताकदीने केलंय. विशेष म्हणजे ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांच्या मदतीला झोमॅटोही धावून आले आहे. बाबा का ढाबा आता झोमॅटोवर लिस्ट झालं आहे. घरबसल्या आता दिल्लीकर झोमॅटोवरुन बाबा का ढाबामधून पदार्थ ऑर्डर करु शकतील.

झोमॅटोने ट्विट करत याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेय की, ”बाबा का ढाबा आता झोमॅटोवर लिस्ट करण्यात आला आहे. आमची टीम तेथील वृद्ध दाम्पत्यासोबत काम करतेय. जेणेकरुन वेळेवर डिलिव्हरी होईल.”

सुनील शेट्टी, स्वरा भास्कर, रवीना टंडन अशा अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर ‘बाबा का ढाबा’च्या मदतीसाठी आवाहन केलं. क्रिकेटर आर. अश्विन, अभिनेता रणदीप हुडा, सोनम कपूर यांनीसुद्धा या वयोवृद्ध जोडप्याची मदत केली आहे. रणदीप हुडाने ‘बाबा का ढाबा’चा पत्ता ट्विटरवर लिहित लोकांना तिथे जाऊन मदत करण्याची विनंती केली. तर ”बाबा का ढाबा’. दिल्लीवालो दिल दिखाओ. जो कोणी इथे येऊन जेवेल त्यांनी मला एक फोटो पाठवा. तो फोटो मी सोशल मीडियावर शेअर करेन. सोबतच तुमच्यासाठी एक खास मेसेजदेखील पाठवेन”, असं आवाहन रविनाने नेटकऱ्यांना केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 6:54 pm

Web Title: delhi baba ka dhaba now listed on zomato as customers nck 90
Next Stories
1 शाळेतील आठवणीत रमले रतन टाटा; नेटकरी म्हणाले, “सर तुम्ही तर…”
2 जागतिक टपाल दिन : WhatsApp ला ‘त्या’ पहिल्या पत्राची सर येईल का?
3 बाकरवडी की भाकरवडी?; चितळे बंधू म्हणतात…
Just Now!
X