News Flash

२१ वर्षीय विद्यार्थ्याला उबरने देऊ केली १.२५ कोटींची ऑफर

दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठाचा विद्यार्थी

दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठात शिकणारा सिद्धार्थ २१ वर्षांचा आहे. ( छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )

भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. आज जगभरातील नामांकित कंपन्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जात आहे. दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठातल्या शेवटच्या वर्षात शिकणा-या सिद्धार्थला देखील उबर कंपनीकडून सव्वा कोटीची ऑफर देण्यात आली आहे.

दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठात शिकणारा सिद्धार्थ २१ वर्षांचा आहे. तो या विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षाला असून कॅम्प्यूटर इंजिनिअरींगचा तो विद्यार्थी आहे. उबर टेक्नॉलॉजी कंपनीने त्याला ७३ लाख वार्षिक पगार आणि लाभांश धरून जवळपास १.२५ कोटींचे पॅकेज  देऊ केल्याचे हिंदुस्तान टाईम्सने म्हटले आहे. ही संधी मिळून आपल्याला खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे. १२ वीत सिद्धार्थला ९५. ४ टक्के मिळाले होते. तर कम्प्युटर सायन्स विषयात त्याला १०० पैकी ९८ गुण मिळाले होते. या वर्षांत ऑक्टोबर महिन्यात नोकरीसाठी तो सॅन फ्रॅन्सिस्कोला जाणार आहे. याआधी त्याने या कंपनीत इंर्टनशिपही केली होती.  एका हिंदी वेबसाईटच्या माहितीनुसार याच विद्यापीठाच्या चेतन कक्कड नावाच्या विद्यार्थ्याला गुगलेने सव्वा कोटींचे पॅकेज दिले होते.

वाचा : उकळत्या तेलात ‘तो’ चक्क हातांनी तळतो भजी

वाचा : अशिक्षित असूनही ‘या’ गावातील तरुणांना येतात चार विदेशी भाषा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 10:49 am

Web Title: delhi boy gets rupees 1 25 crore placement offer from uber
Next Stories
1 Video : गाडीच्या बोनेटवरच पोलिसांनी तयार केलं ऑमलेट
2 …तिचा गगनचुंबी थरार!
3 कर्जबुडव्यांना यापुढे विमान, बुलेट ट्रेनमध्ये बंदी
Just Now!
X