21 January 2021

News Flash

पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्ये केलं किळसवाणं कृत्य, व्हिडिओ होतोय व्हायरल

किळसवाणा प्रकार लिफ्टमधल्या सीसीटीव्हीमध्ये झाला कैद

( व्हायरल व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट )

लॉकडाउनदरम्यान खाद्यपदार्थ किंवा सामानाची होम डिलिव्हरी मागवण्याच्या प्रमाणात वाढ झालीये, अशात एका डिलिव्हरी बॉयचा अत्यंत किळसवाणा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रहिवाशी इमारतीत कोणाच्या तरी घरी पार्सल देण्यासाठी आलेला असताना हा डिलिव्हरी बॉय लिफ्टने वर जात होता. लिफ्टमध्ये कोणीही नसताना त्याने चक्क लिफ्टमध्येच लघुशंका केली. गुजरातच्या अहमदाबादमधील ही घटना असल्याचं सांगितलं जात असून हा किळसवाणा प्रकार लिफ्टमधल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. धक्कादायक म्हणजे लघुशंका करताना तो वारंवार लिफ्टमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहत होता. तसंच, हेल्मेटने स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता. गुजरातमधल्या स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध पिझ्झा डिलिव्हरी आउटलेट डॉमिनोजच्या डिलिव्हरी बॉयने हा घृणास्पद प्रकार केल्याचा दावा केलाय.  बघा व्हिडिओ :


नेटकऱ्यांमध्ये ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान, डिलिव्हरी बॉयवर काही कारवाई झाली की नाही याबाबत मात्र अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी डिलिव्हरी बॉयविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 8:39 am

Web Title: delivery boy urinating in lift in ahmedabad video goes viral sas 89
Next Stories
1 शेतकऱ्याची कमाल! सिंचनासाठी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या टोलवाटोलवीला कंटाळून केला ‘अविष्कार’
2 ट्रम्प यांच्यावरील ‘ती’ कारवाई पंतप्रधान मोदींच्या पथ्यावर, झाला मोठा फायदा
3 Viral Video : जंगलात थेट सिंहाशी भिडला कुत्रा, पुढे काय झालं ते एकदा बघाच
Just Now!
X