News Flash

…मग आता हिमाचलमधील प्रियंका गांधीच्या बंगल्यावरही कारवाई करा, कंगनाच्या चाहत्यांची मागणी

शिमल्यापासून १३ किमी दूर छराबडा येथे आहे प्रियंका यांचा बंगला

फोटो सौजन्य: सोशल मिडिया

अभिनेत्री  कंगना रणौत विरुद्ध शिवसेना या संघर्षामध्ये काँग्रेस नेत्यांनी कोणतीही भूमिका न घेतल्याची टीका सोशल मिडियावरुन केली जात आहे. बुधवारी मुंबईमधील वांद्रे येथील कंगनाच्या ऑफिसवर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत बुल्डोझर चावला. या कारवाईनंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या हिमाचल प्रदेशमधील बंगल्यावरही कारवाई करण्याची मागणी कंगनाच्या समर्थकांनी केली आहे. कंगनाचे ४८ कोटींच्या कार्यालयावर आज मुंबई महापालिकेने कारवाई केली. त्यानंतर इंटरनेटवर यासंदर्भात अनेक हॅशटॅग व्हायरल होत आहेत. कंगनाचे मूळ गाव असणाऱ्या हिमाचलमधील प्रियंका यांच्या बंगल्यावर राज्य सरकारने कारवाई करावी असं कंगनाच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.

ट्विटवर काही कंगना समर्थकांनी ‘शिमल्यात असणारा प्रियंका गांधीचा बंगलाही अनधिकृत आहे. त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे’, अशी मागणी केली आहे. काही जणांनी आपल्या पोस्टमध्ये हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनाही टॅग केल आहे. तर एकाने उपहासात्मक टोला लगावत, ‘प्रियंका गांधींनी शिमल्यात एकदम छान घर बांधलं आहे. त्यांना जमीन कशी मिळाली मला ठाऊक नाही,’ असं म्हटलं आहे. तर कंगनाच्या एका चाहतीने हिमाचल प्रदेश सरकारनेही प्रियंका यांचे बेकायदेशीर घर तोडलं पाहिजे असं ट्विट केलं आहे. #DemolishPriyankaHimachalHome हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी या बंगल्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याचे दिसून आलं.

१)

२)

३)

४)

५)

६)

काय आहे वाद?

२००८ साली प्रियंका गांधी यांच्या मालकीच्या या बंगल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिमाचलमधील काँग्रेसचे नेता केहर सिंह खाची यांच्या नावावर प्रियंका यांचा बंगला असणाऱ्या भूखंडाची पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. सन २०११ मध्ये दोन मजल्यांपर्यंतचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर डिझाइन न आवडल्याने पूर्ण बांधकाम तोडण्यात आलं होतं. प्रियंका यांना घर बांधण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने लॅण्ड रिफॉर्म कायद्यामधील कलम ११८ मधील नियमांमध्ये सूट देण्यात आल्याचा आरोप केला जातो. या कलमानुसार हिमाचलमध्ये बाहेरील राज्यांमधून आलेल्या व्यक्तींना जमीन विकत घेता येत नाही. सन २००७ मध्ये ०.४० एकर (एक बिगा) जमीनीची किंमत १ कोटी रुपये इतकी होती. प्रियंका यांनी चार बिगा म्हणजेच १.६० एकर जमीन अवघ्या ४७ लाखांना विकत घेतली.

प्रियंका गांधी यांचा हा बंगला शिमल्यापासून १३ किलोमीटर दूर आहे. हे घर खास हिमाचली पहाडी वास्तूकलेनुसार बनवण्यात आलं आहे. इंटीरीयरसाठी देवदारच्या झाडाचे लाकूड वापरण्यात आलं आहे. घराच्या चहूबाजूला हिरवळ आणि पाइन वृक्ष आहेत. समोर हिमायलाच्या पर्वत रांगा दिसतात. हा बंगला छराबडा परिसरात आहे. या घरासंबंधितील वादावरुन प्रियंका यांना उच्च न्यायालयाची नोटीसी मिळाली आहे. प्रियंका अनेकदा सुट्ट्यांसाठी या बंगल्यावर येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 5:22 pm

Web Title: demolish priyanka gandhi himachal home twitter trend scsg 91
Next Stories
1 Viral Video: “शेण आणि मातीच्या सानिध्यात जन्म झालाय माझा, मला करोना शिवणारही नाही”
2 Viral Video: त्याला राग येतोय… संतापलेल्या हत्तीने सायकल उचलली अन्…
3 ‘खाकी’तील समाजभान! मजुरांच्या मुलांना पोलीस देतोय मोफत शिक्षण
Just Now!
X