धोनीची चिमुकली झिवा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या तर तिच्या बालहरकतींमुळे अनेकदा तिच्याबाबत चर्चा होताना दिसते. असाच सध्या तिने गायलेल्या एका गाण्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. यामध्ये झिवाने गायलेले एक मल्ल्याळी गाणे तिच्या सुरात ऐकायला मिळत आहे. त्यामुळे इंटरनेटवरील तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसते. आपल्या बोबड्या सुरात झिवा १९६४ च्या ओमनाकुंथन या चित्रपटातील गीत गात असल्याचा हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

कधी आपल्या लाडक्या बाबांसाठी मैदानात पाण्याची बाटली घेऊन धावत जाणारी झिवा, कॅप्टन कूलसोबत लाडू फस्त करणारी चिमुकली असे तिचे नाना तऱ्हेचे अंदाज कायमच भावणारे ठरतात. नुकताच झिवा स्वयंपाक घरात आपल्या आईसोबत पोळ्या लाटत होती. काही दिवसांपूर्वीच झिवाच्या नावानं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करण्यात आलं होतं. याच इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये झिवा मोबाईलमध्ये पाहून गाणे म्हणत असल्याचे दिसते. सध्या झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फॉलोअर्सची सध्या ही ९५ हजारांहून अधिक आहे. एका दिवसात हा व्हिडिओ १ लाख ६० हजार जणांनी पाहिला आहे. मल्याळम ही अवघड भाषा समजली जात असताना जवळपास ३ वर्षांच्या मुलीने म्हटलेले गाणे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरत आहे.