News Flash

साडेबारा हजार हिरे, व्यापाऱ्यानं तयार केली अनोखी अंगठी; झाला जागतिक विक्रम

पाहा काय आहे खास या अंगठीत

एका २५ वर्षीय व्यापाऱ्यानं तयार केलेली हिऱ्यांची अंगठी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याचं कारणही तसंच आहे. या हिऱ्याच्या अंगठीची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. या अंगठीची विशेष बाब म्हणजे या अंगठीत छोटे मोठे असे १२ हजार ६३८ हिरे लावण्यात आले आहेत. या अंगठीला त्या व्यापाऱ्यानं ‘मॅरीगोल्ड’ असं नावही दिलं आहे. याचं वजन केवळ १६५ ग्राम इतकं आहे. सध्या ही अंगठी विकण्याची इच्छा नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

हर्षित बन्सल असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. ही अंगठी तयार करणं हे आपलं स्वप्न होतं असंही तो म्हणतो. ही अंगठी सहजरित्या घालता येऊ शकते. “जेव्हा सुरतमध्ये ज्वेलरी डिझाईनचं शिक्षण घेत होतो त्यावेळी म्हणजेच दोन वर्षांपूर्वी या अंगठीची कल्पना आपल्या डोक्यात आली,” असं हर्षितनं सांगितलं.

“मी या अंगठीत दहा हजारांपेक्षा अधिक हिरे लावण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. मी यासाठी अनेक डिझाईन तयार केले. परंतु ते कामी आले नाहीत. सध्या ही अंगठी विकण्याचा कोणताही विचार नाही. ही अंगठी तयार होणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असंही तो म्हणाला. यापूर्वी हिऱ्यांची अंगठी तयार करण्याचा विक्रम एका भारतीयाच्याच नावावर होता. त्या अंगठीमध्ये तब्बल ७ हजार ८०१ हिरे होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 10:58 am

Web Title: diamond ring has earned a place in the guinness world records made by indian jud 87
Next Stories
1 Hyderabad Election Result : ८७ जांगावरील आघाडी थेट २५ वर आल्याने भाजपा ट्रोल; नेटकरी म्हणाले, “हा प्रँक होता”
2 गूढ उलगडलं… पृथ्वीभोवती मागील ५४ वर्षांपासून फिरणाऱ्या ‘त्या’ रहस्यमय वस्तूबद्दल ‘नासा’चा मोठा खुलासा
3 #DiljitVsKangana: ‘कंगना को दिलजीत पेल रहा है’ विरुद्ध ‘कंगना रानौत शेरनी है’… मिम्समधून धम्माल टोलवाटोलवी
Just Now!
X