जपानमधील एका हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी स्वागतकक्षावर डायनोसॉर आहे. वाचून थोडं चकित व्हाल. टोकिओतील एका हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकाच्या स्वगताची जबाबदारी चक्क डायनोसॉरवर सोपवण्यात आली आहे. हा डायनोसॉर खराखुरा नव्ही तर एक रोबट आहे.

स्वागतकक्षावर काही विचारपूस केल्यानंतरच हा डायनोसॉर माहिती देतो. कारण येथे लावण्यात आलेल्या सेन्सरमुळे रोबोटिक डायनोसॉरला आलेल्या ग्राहकांबद्दल समजते. सेन्सरच्या कक्षेमध्ये व्यक्ती किंवा ग्राहक आल्यानंतर रोबोटिक डायनोसॉर स्वागत करतो.

‘हेन ना’ असे त्या जपानी हॉटेलचे नाव आहे. ‘हेन ना’ म्हणजेच वेगळेपण. सध्या हे हॉटेल जपानमध्ये प्रसिद्ध झाले असून चर्चेचा विषय ठरला आहे. ‘हेन ना’ जपानमधील पहिलेच हॉटेल आहे. येथे रोबो-डायनोसॉर जोडी स्वागतकक्षावर आहेत. या जोडीला पाहिल्यानंतर हॉलिवूड चित्रपट ज्युरॅसिक पार्क डोळ्यासमोर येतो.

विषेश म्हणजे रोबोटिक डायनोसॉरमध्ये ग्राहकांना आवडीची भाषा निवडण्याचा पर्यायही दिला आहे. या रोबोटिक डायनोसॉरजवळ एक टॅबलेट सिस्टम आहे. टॅबलेट सिस्टममुळे ग्राहक जापानी, इंग्रजी, चीनी, कोरियनसारख्या अनेक भाषांमधून रोबट संवाद साधतो.

हॉटेलच्या प्रत्येक रूममध्ये एक छोटा रोबट आहे. हा रोबट ग्राहकांच्या सुचनेनुसार टिव्हीचा चॅनेल बदलण्यासापासून ऑर्डर देण्यापर्यंत सर्व काम करतो.