‘गुलाबी शहर’ म्हणून ओळखले जाणारे जयपूर शहर दिवाळीनिमित्त लक्षलक्ष दिव्यांनी उजळून निघाले आहे. दिवाळीसाठी शहरातील चौकाचौकात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रकाशात न्हाऊन निघालेल्या या गुलाबी नगरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

साधारण ऑक्टोबरपासून जयपूरमध्ये अनेक विदेशी पर्यटक यायला सुरूवात होते. राजस्थानमधल्या या शहराला विदेशी पर्यटकांची सर्वाधिक पसंती आहे. नाहरगढावरील टेकड्यांवरुन दिवाळीच्या दिवसात गुलाबी शहराचं सुंदर रुप दिसते. ही झगमगती नगरी आपल्या कॅमेरात टिपण्यासाठी देशीच नाही तर अनेक विदेशी पर्यटकसुद्धा नाहरगढावर येतात. या टेकड्यांवरून संपूर्ण जयपूर नगरीचे विहंगम दृश्य पाहता येते.

mobile theft kopar khairane police marathi news,
नवी मुंबई: चोरट्यांकडून जप्त केलेले ५० मोबाईल मुळ मालकांना सुपुर्त, कोपरखैरणे पोलीसांची कामगिरी
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Operation Nanhe Farishte 1064 children were rescued
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ काय आहे माहितीये का? मायेला मुकलेल्या चिमुकल्यांना…
Fact Check This aerial shot shows 2019 rally in Kolkata not INDIA bloc rally in Delhi
“मोदी तुफान बनूनच निघून जातील..”, म्हणत व्हायरल होणाऱ्या दिल्लीतील या गर्दीचा खरा चेहरा काय? पाहा फरक

पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून ‘या’ गावांत फटाके फोडतच नाही!

जयपुरमध्ये दिवाळीच्या काळात सर्वोत्कृष्ट सजावटीचीही स्पर्धा असते. या शहरातील जुन्या गणपति प्लाझा इमारतीला रोषणाई केली जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वोत्कृष्ट सजावटीचा पुरस्कार या इमारतीला मिळतो आहे. डोळ्याचे पारणे फिटेल अशी रोषणाई या शहराचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे ही रोषणाई पर्यटकांना आणखीनच आकर्षित करते.

Video : सचिनने चाहत्यांना दिलेला संदेश तुम्हीही ऐकलाच पाहिजे!