23 November 2017

News Flash

‘बाटा’बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

आठवड्याला विकले ३५०० शूजचे जोड

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 12, 2017 12:02 PM

भारतात आपल्याला आवडतील अशा आणि बजेटमध्ये बसणाऱ्या चपलांच्या ब्रँडमध्ये बाटा कंपनी अग्रेसर असल्याचे म्हणता येईल. चप्पल आणि बुटातील अनेक पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या या कंपनीची पादत्राणे वापरणे तुम्हालाही नक्कीच आवडत असेल. पण भारतीय नसणाऱ्या आणि या कंपनीबाबतच्या काही विशेष गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? बहुदा नाहीच, तर पाहूया या कंपनीबाबतच्या काही खास गोष्टी

१८९४ मध्ये झेक प्रजासत्ताक देशात बाटा कंपनीने आपल्या वाटचालीला सुरुवात केली. या कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांचा १९३२ मध्ये एका विमान अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे ४० वर्षे कंपनीची सूत्रे सांभाळल्यानंतर हा व्यवसाय त्यांच्या मुलाने पुढे नेला. विशेष म्हणजे हा मुलगा जेव्हा व्यवसायात उतरला तेव्हा त्याचे वय होते अवघ १८ वर्ष. ‘झी न्यूज’ ने दिलेल्या वृत्तानुसार, १९३५ मध्ये हे ज्युनियर बाटा कंपनीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने कराचीवरुन कोलकातामध्ये आले. त्यावेळी भारतात चपला जपानहून आयात केल्या जात होत्या आणि भारतात एकही चपलांची कंपनी नव्हती.

सोशल मीडियावर काही अपलोड करताय? सावधान !

१९३९ मध्ये म्हणजे अवघ्या ४ वर्षात बाटा यांनी कोलकातामध्ये शूज तयार करण्यास सुरुवात केली. त्यांचे हे उत्पादन भारतीयांच्या पसंतीस पडले. त्यानंतर त्यांचं उत्पादन इतकं वाढलं की केवळ भारतात त्यांचे दर आठवड्याला सुमारे ३५०० शूजचे जोड विकले जाऊ लागले. यानंतर बाटा यांनी पाटणामध्ये आपली लेदर फॅक्ट्री सुरू केली. हा भाग आता बाटागंज नावानं ओळखला जातो. सध्या बाटांची १८ देशांत २३ उत्पादन युनिटस आहेत. २००४ मध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ने बाटाला जगातील सर्वात मोठी शूज मॅनिफॅक्चरर आणि रिटेलर म्हणून घोषितही केले आहे.

Viral Video : पितृपक्षात कावळ्याला बळजबरीने भरवला जातोय पिंड, सत्य मात्र वेगळंच

First Published on September 12, 2017 11:30 am

Web Title: do you know the fact about bata shoe company