News Flash

डॉक्टर-नर्सचं हॉस्पिटलमध्येच ‘शुभमंगल सावधान’, फोटोंवर लाइक, कमेंटचा पाऊस

करोना संकटकाळात केलं लग्न

करोना व्हायरसच्या या संकटकाळात एका डॉक्टर आणि नर्सने रुग्णालयातच लग्न केले. दोघेही त्याच रुग्णालयात काम करतात. यूके लंडनमधल्या हॉस्पिटलमध्ये   हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे सुंदर फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, ३४ वर्षीय जैन टिपिंग आणि ३० वर्षीय अनालन नवरात्नम ऑगस्टमध्ये विवाहबद्ध होणार होते.

पण श्रीलंका आणि उत्तर आयर्लंडमधुन  कुटुंबीयांना उपस्थित राहणे कदाचित शक्य होणार नाही अशी भिती त्यांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी  रुग्णालयात लग्न करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्यातच लंडनच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये त्यांनी लग्न केले. या लग्न सोहळयाला त्यांचे कुटुंबीय आणि मित्र-परिवार व्हर्च्युअली उपस्थित होता.

“सर्वजण ठणठणीत, तंदुरुस्त असताना आम्हाला लग्न करायचे होते. मग भले आमच्या प्रियजनांनी आम्हाला स्क्रिनवर पाहिले तरी चालेल” असे टिपिंग यांच्या हवाल्याने हॉस्पिटलने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. २४ एप्रिलला हे लग्न पार प़डले. रुग्णालयाने दोन दिवसांपूर्वी टि्वटर हँडलवर या लग्नाचे फोटो शेअर केले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत. २० हजार लोकांनी या फोटोला लाईक केले असून शेकडो लोकांनी त्यांना कमेंटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 5:21 pm

Web Title: doctor and nurse get married at hospital amid covid 19 crisis dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Viral Video: रोबो डॉग करतोय मेढ्यांची राखण; पाहणारेही झाले थक्क
2 सोशल मीडियावर नागपूर पोलिसांचा फिल्मी अंदाज
3 जगातील सर्वात वेगवान इंटरनेट; एका सेकंदात डाउनलोड करता येणार हजार HD Movies
Just Now!
X