News Flash

वडिलांना वाचवण्यासाठी तिने यकृत दिले

मुली 'जीवनदायिनी'सुद्धा असतात

वडिलांना वाचवण्यासाठी तिने यकृत दिले
मुली फक्त डोक्यावरचं ओझं किंवा 'पराया धन'नसून ती जीवनदायिनी सुद्धा आहे हे या मुलीने दाखवून दिले आहे. (छाया सौजन्य : DrRachit Bhushan Shrivastva/Facebook)

‘वंशाचा दिवा’ हवा असा अनेक कुटुंबाचा अट्टहास असतो, त्यामुळे देशात स्त्री भ्रुण हत्यांचे प्रमाण वाढले आहे. ज्या देशात देवीची पूजा केली जाते तिथे मुलीला मात्र जन्मला येण्याआधीच मारून टाकले जाते. म्हणूनच देशात दरहजार पुरुषांच्या तुलनेत मुलींच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी देश पातळीवर सरकार आणि विविध संस्था, संघटनांमार्फत ‘बेटी बचाओ’ मोहीम राबवत आहे.

Viral Video : डोनाल्ड ट्रम्पच्या नातीचे मँडरिन ऐकून चीनचे राष्ट्रध्यक्षही प्रभावित झाले

Viral Video : आलिया, सनी लिओनचा डान्स तिच्यासमोर पडला फिका

मुलगी वंशाचा दिवा नाही, ती घर सांभाळू शकत नाही असं ज्यांना वाटतं त्या प्रत्येकासाठी वाचण्यासारखी एक पोस्ट व्हायरल होत आहे. मुंबईत राहणाऱ्या पूजा बिर्जानिया या धाडसी मुलीने आपलं यकृत वडिलांना दिलं आहे. तिच्या वडिलांचं यकृत निकामी झालं होतं. त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून वडिलांना वाचवण्यासाठी तिने आपले यकृत वडिलांना दिले. झारखंड येथील हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ. रचित भूषण श्रीवास्तव यांनी ही पोस्ट फेसबुकच्या माध्यमातून जगासमोर आणली आहे. मुली फक्त डोक्यावरचं ओझं किंवा ‘पराया धन’नसून ती जीवनदायिनी सुद्धा आहे हे या मुलीने दाखवून दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2017 11:48 am

Web Title: doctor shares story of young girl who donated liver to her father
Next Stories
1 उबर चालकासोबत घडला धक्कादायक प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
2 Video : दोन वर्षांच्या मुलीने पहिल्यांदा आईला बघितले; आईची प्रतिक्रिया बघून व्हाल भावूक
3 अबब! या व्यक्तीकडे आहेत ४ हजार गन्स
Just Now!
X